मराठा आरक्षणासाठी मंगळवेढयात रणरागिणी मैदानात; मशाली पेटवून आंदोलनाचा एल्गार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 07:46 PM2021-06-05T19:46:06+5:302021-06-05T19:46:34+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

At Ranaragini Maidan on Tuesday for Maratha reservation; Elgar of agitation by lighting torches | मराठा आरक्षणासाठी मंगळवेढयात रणरागिणी मैदानात; मशाली पेटवून आंदोलनाचा एल्गार 

मराठा आरक्षणासाठी मंगळवेढयात रणरागिणी मैदानात; मशाली पेटवून आंदोलनाचा एल्गार 

Next

मंगळवेढा : मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर ५ जून रोजी शहरातील रणरागिणीनी आरक्षणाची प्रतिकात्मक  मशाल पेटवून   केद्रं सरकार, राज्य शासनाने मराठा समाजाचे आरक्षण व मागण्या मान्य नाही केल्यास मराठा आरक्षणाच्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल असा संदेशच जणू  या मशाली पेटवून दिला.

यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे ... जय जिजाऊ जय शिवराय  हर...हर... महादेव अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आरक्षणाचा लढा जर ६ जूननंतर तिव्र झाला तर या आरक्षणाचा लढाईत मंगळवेढ्यातील जिजाऊच्या लेकी सगळयात पुढे असतील व वेळ प्रसंगी हातात तलवारी घ्याव्या लागल्या तरीही त्या घेऊ पण मराठा समाजाचा हक्काचा मागण्या व आरक्षण हे मिळवल्याशिवाय शांत रहाणार नाही, असा निर्धार वजा इशाराच केंद्र सरकार व राज्य सरकारला यावेळी या रणरागिणीकडून देण्यात आला.


या आंदोलनात सुप्रिया अजित जगताप, स्वाती सतिश दत्तू, हेमा अर्जुन ओमणे, रेश्मा युवराज लुगडे, रूपाली विनायक कलुबर्मै, प्रतिक्षा मुरलीधर दत्तू, लक्ष्मी महादेव वाकडे, अंकिता सुहास चेळेकर या रणरागिणीनी सहभागी होत्या. आज परत एकदा त्याच जिजाऊच्या सावित्रीबाईंच्या लेखी मैदानात उतरल्या आहेत. मराठा समाजाचा मागण्या व आरक्षणासाठी मराठा समाजाने आरक्षणासाठी सुरुवातीला जे ५८ मोर्चे काढले होते, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदविला होता. त्याप्रमाणे मंगळवेढ्यातून ही  सोलापूरला निघालेल्या मराठा मोर्चा मध्ये अतिशय  उस्फूर्तपणे व मोठ्या प्रमाणात महिला  सहभागी झालेल्या होत्या.

Web Title: At Ranaragini Maidan on Tuesday for Maratha reservation; Elgar of agitation by lighting torches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.