विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे एमडी रणवरे यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:18+5:302021-01-02T04:19:18+5:30
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामध्ये सन २००७ साली जनरल मॅनेजर या पदावर रुजू झाले होते. २००८ ...
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामध्ये सन २००७ साली जनरल मॅनेजर या पदावर रुजू झाले होते. २००८ मध्ये आर. एस. रणवरे यांनी प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून पदभार घेतला. साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिटन साडेतीन हजारांवरून साडे अकरा हजार मेट्रिक टन केली. याचबरोबर सहवीज निर्मिती प्रकल्प, डिस्टिलरी प्रकल्प सुरू केले. तसेच विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची पतसंस्था स्थापन करून पतसंस्थेमार्फत विनातारण सात लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले. त्यामुळे साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक प्रगती साधण्यास मदत झाली.
-----
साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी मला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक पदावर काम करण्याची संधी दिली. माझ्या परीने मी त्या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.
- आर. एस. रणवरे,
कार्यकारी संचालक,
विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना
----