रणजी सामना; अंकित बावणेची १५३ धावांची खेळी; दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राची मणिपूर संघावर ९८ धावांची आघाडी
By Appasaheb.patil | Published: January 6, 2024 05:52 PM2024-01-06T17:52:44+5:302024-01-06T17:53:16+5:30
अंकित बावणे यांनी वैयक्तिक नाबाद १३२ धावा केल्या होत्या.
सोलापूर : महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर या दोन संघात रणजीचा क्रिकेट सामना सोलापुरात सुरु आहे. अंकित बावणे व केदार जाधव यांनी दुसऱ्या दिवसाच्या डावाची सुरुवात केली. पहिल्याच सत्रात मोठा झटका मणिपूर संघाने दिला. कर्णधार केदार जाधव याने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. मात्र ५६ धावांवर बिश्र्वोरजित याने बाद केले. त्यानंतर अंकित बावणे वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला आपली चमक दाखवता आली नाही.
दरम्यान, जेवणाच्या वेळेपर्यंत महाराष्ट्र संघाने ९ बाद २९७ धावा केल्या, त्यामध्ये अंकित बावणे यांनी वैयक्तिक नाबाद १३२ धावा केल्या होत्या. जेवणानंर अंकित बावणे याने १५३ धावा केल्यानंतर अंकित बावणे याने आपली विकेट गमावली. महाराष्ट्र संघाने ८१.१ षटकात १० बाद ३२० धावा केल्या. त्यामध्ये महाराष्ट्र संघाला १८३ धावांची आघाडी मिळाली.
मणिपूर संघाकडून बिश्र्वोरजित याने ७७ धावा देत ४ बळी टिपले .त्याला किसन संघा ३ व अजय सिंह याने २ बळी घेत साथ दिली. मणिपूर संघाचा दुसऱ्या डावात पडखळ सुरुवात झाली. ३१ धावांवर एकापाठोपाठ २ बळी पडले. महाराष्ट्र संघाकडून हितेश वाळुंज व विकी ओसवाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यानंतर नितेश याला २६ धावांवर हेतेश वाळुंज याने यष्टिरक्षक निखिल नाईक याच्या मदतीने झेलबाद केले. त्यापाठोपाठ जॉन्सन यालाडेखील हितेश वाळुंज यानेच २३ धावांवर यष्टिरक्षक निखिल नाईक च्या मदतीने यष्टीचीत केले. दुसऱ्या दिवसआखेर मणिपूर संघाची धावसंख्या ३ बाद ८६ धावा अशी झाली आहे.