रणजितसिंह देशमुख यांना पीएच.डी प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:42+5:302021-05-13T04:22:42+5:30
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, ज्येष्ठ विश्वस्त महादेव गायकवाड, माजी झेडपी अध्यक्षा जयमाला ...
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, ज्येष्ठ विश्वस्त महादेव गायकवाड, माजी झेडपी अध्यक्षा जयमाला गायकवाड, संस्थेचे सचिव अंकुश गायकवाड, डॉ. यशोदीप गायकवाड, विक्रांत गायकवाड, निखिल गायकवाड यांनी कौतुक केले. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला. त्यांनी अभियांत्रिकीची पदवी २००७ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून प्राप्त केली. २००९ मध्ये त्यांनी सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये अधिव्याख्याता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. २०१२ मध्ये मेकॅनिकल डिझाईनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून २०१४ मध्ये त्यांनी कॉलेजचे प्राचार्य म्हणून जबाबदारी स्वीकारली. प्राचार्यपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत असताना त्यांनी संशोधनाकडे लक्ष देऊन जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या बळावर हे उत्तुंग यश संपादन केल्याचे ज्येष्ठ विश्वस्त एम. आर. गायकवाड यांनी सांगितले.