डिसले गुरुजींचा अमेरिकेला जाण्याचा प्लॅन; ८ ऑगस्टला मांडणार बाजू, राजीनाम्यावर ठाम
By शीतलकुमार कांबळे | Updated: July 14, 2022 19:08 IST2022-07-14T19:07:46+5:302022-07-14T19:08:51+5:30
आपल्या गैरहजरीबाबत रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आवश्यक ती कागदपत्रे दिल्याचे सांगितले.

डिसले गुरुजींचा अमेरिकेला जाण्याचा प्लॅन; ८ ऑगस्टला मांडणार बाजू, राजीनाम्यावर ठाम
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर : ग्लोबल टिचर अवार्ड विजेते रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला असून ते या निर्णयावर ठाम आहेत. फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी ते आठ ऑगस्ट रोजी ते अमेरिकेत जाणार आहेत. त्याचवेळी ते आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडतील. शाळेमध्ये 34 महिने गैरहजर असल्याच्या प्रकरणी रणजीतसिंह डिसले यांच्याकडून 17 लाख रुपयाचे वेतन परत घेणार असल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी बुधवार 14 जुलै रोजी सांगितले.
आपल्या गैरहजरीबाबत रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आवश्यक ती कागदपत्रे दिल्याचे सांगितले. राजीनामा देण्याचा निर्णय हा पूर्ण विचर करुन घेतला आहे. त्यामुळे माघारी घेण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले. आठ ऑगस्ट रोजी रात्री मुबंईतून ते अमेरिकेसाठी निघणार आहेत. तिथे चार महिन्यासाठी असणार आहेत.