कोकणच्या राणमेव्यानं केलं सोलापूरकरांचं तोंड रसाळ!
By काशिनाथ वाघमारे | Published: April 25, 2023 04:06 PM2023-04-25T16:06:30+5:302023-04-25T16:06:56+5:30
जांभूळ म्हणजे जंगली फळ. पण या फळाकडे फक्त सिझनेबल फळ म्हणून पाहू नका.
सोलापूर : दर उन्हाळ्यात जीभेला पाणी सोडणारी आणि तोंड रसाळ करवून सोडणारी मलकापूरची जांभळं आणि शहावड्याची काळीमैना सोलापुरात दाखल झाली आहेत. मात्र या फळांचा तुटवडा जाणवतोय.
जांभूळ म्हणजे जंगली फळ. पण या फळाकडे फक्त सिझनेबल फळ म्हणून पाहू नका. दोन अडीच महिन्यात भरपूर जांभळं खाऊन घ्या. पुढे वर्षभर जांभळाच्या बिया, झाडाची साल, पानं, ज्युसेसचा आणि सिरपचा मुलांसाठी उपयोग करा. कारण जांभळाचे १७ आरोग्यदायी फायदे आहेत. जांभूळ खाल्ल्यानंही आपण फीट राहू शकतो.
आंबे, काजूपाठोपाठ अन्य काही फळं कोकाणातून याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतात. यंदा दोनही फळांची आवक कमी आहे. शहरातील लक्ष्मी मार्केट, कस्तुरबा मार्केट, चिप्पा मार्केटसह अनेक ठिकाणच्या खुला बाजारातून ती उपलब्ध होत आहेत. सध्या जांभळांचा दर ७० रुपये तर काळी मैनाचा दर हा ६० रुपये आहे. मात्र या फळांचा तुटवडा जाणवतोय.
जांभळं आरोग्यसाठी फायदेशीरच..
जांभळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
- या फळाचा सर्वाधिक फायदा हा मधुमेहाच्या आजारात होतो.
- जांभळामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते.
- जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचे रुपांतर ऊर्जेमध्ये होते.
- या फळाचा उपयोग मधुमेहातील प्राथमिक लक्षणांवर होतो.
- जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अॅनेमिया यावरही होतो.
- मधुमेह, ह्रदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचाविकारावर जांभूळ आहे गुणकारी!
- जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साल, जांभळाचा रस याचाही मधुमेहावर उपचार करताना दिसते.