लक्ष्मीटाकळीचे तंटामुक्त अध्यक्षासह पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:26 PM2020-12-19T13:26:24+5:302020-12-19T13:28:40+5:30

लक्ष्मीटाकळी येथील एकाकडून जेवण खाऊन घेतले १० हजार रुपये

Ransom case filed against journalist | लक्ष्मीटाकळीचे तंटामुक्त अध्यक्षासह पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल

लक्ष्मीटाकळीचे तंटामुक्त अध्यक्षासह पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल

Next

पंढरपूर :   अ‍ॅट्रॉसीटी, जबरी चोरीचा गुन्हा तुझ्याविरुध्द दाखल करतो, अशी भिती दाखवून हॉटेलात जेवण व १० हजार रुपयांची  खंडणी तीन जणांनी स्विकरली आहे. या प्रकरणी लक्ष्मीटाकळीचे तंटामुक्ती अध्यक्ष  तानाजी गोविंद कांबळे (रा. लक्ष्मी टाकळी ,पंढरपूर),  साप्ताहीक पोलीस आॅफीसरचे पत्रकार ज्योतीराम भानुदास कांबळे (रा.भटूंबरे ता.पंढरपूर) व पांडूरंग अहीलाजी शेळके (रा. अंबीकानगर, जुना सोलापूर रोड, पंढरपूर) यांच्या विरुध्द पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

चंद्र्रकांत सदाशीव  आवटे (वय ३८, रा. लक्ष्मीटाकळी, ता.पंढरपूर) यांना तानाजी कांबळे हा एप्रील २०१९ पासून  खंडणी मागून ब्लॅकमेल करत होता.  मोबाईल  चोरी केल्याची केस घालतो, मला तात्पुरते १० हजार रुपये दे, तुझी केस वर्षभर चालेल, पुढचं पुढ बघू' असे म्हणून मानसीक त्रास देत होता. १६ डिसेंबर रोजी आवटे यांच्याकडून धमकावून जेवण घेतले. त्याच दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास तानाजी कांबळे याने आवटे यांच्याकडून खंडणी म्हणून ३ हजार रुपये घेतले. त्या वेळचे व्हाईस रेकॉर्डीग आवटे यांनी केले आहे. 

चंद्रकांत आवटे यांनी १७ डिसेंबर रोजी  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे  तकारी अर्ज दिला. त्या अर्जाची चौकशी चालू असताना १८ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास तानाजी कांबळे याने आवटे यांना धमकी देवून खंडणीची रक्कम ७ हजार रुपये श्रीराम हॉटेल येथे स्विकारले.  त्यावेळी तानाजी कांबळे याने त्याच्यासोबत असलेल्या  पांडूरंग  शेळके यांच्याकडे ती रक्कम दिली. व पांडुरंग शेळके व  ज्योतीराम भानुदास कांबळे यांना तेथून निघून जाण्यास सांगून तो स्वत: गोल्डन टि हॉटेलमध्ये पळून गेला होता. पोलीसांनी त्यांना रंगेहात पकडून चौकशीकरीता ताब्यात घेतले आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदशनाखाली सपोनि जगदाळे, पोसई हमीद शेख, पोहेकॉ सुरेश माळी, पोकॉ लोंढे, रोंगे, शिंदे, गुटाळ, बनसोडे यांनी छापा कारवाई केली आहे. पुढील तपास सपोनि. मकदुम हे करत आहेत.

 

पंढरपूरात कोणास खंडणी मागून  आर्थीक, मानसीक, शारीरीक नुकसान केले असल्यास त्याबाबत माझ्याशी व पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

-  विक्रम कदम 

उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर 

Web Title: Ransom case filed against journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.