जातीवाचक शिवीगाळ करुन पत्नीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा, नवऱ्याला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी
By विलास जळकोटकर | Updated: March 16, 2024 18:29 IST2024-03-16T18:28:30+5:302024-03-16T18:29:01+5:30
रियाज लालसाब पटेल व त्याची पत्नी असे गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.

जातीवाचक शिवीगाळ करुन पत्नीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा, नवऱ्याला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी
सोलापूर: दुसरीकडील काम सोडायला लावून काम करुन घेऊन पगार दिला नाही. उलट जातीवाचक शिवीगाळ करुन पत्नीचा विनयभंग केला, कोणाला सांगितले तर पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा झाला आहे. हा प्रकार १७ नोव्हेंबर २०२३ ते १० मार्च २०२४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रियाज लालसाब पटेल व त्याची पत्नी असे गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी जिल्ह्यातील जकराया शुगर फॅक्टरीमध्ये कामाला होता. तेथून नमूद आरोपीने फिर्यादीला तेथील काम सोडायला लावून ऑगस्ट २०२३ मध्ये एअर कॉम्प्रेसर कामासाठी कुटुंबासह बोलावून घेतले. काम करवून घेऊनही पगार, घरभाडे न देता जातीवाचक जातीवाचक शिवीगाळ केली.
तसेच कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पत्नीला ‘तू मला खूप आवडतेस, आपण दोघे एकत्र राहू, तुझ्या नवऱ्याला सोडून दे म्हणून अश्लील मागणी केली. नवऱ्याला काही सांगितले तर त्याला ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जाब विचारला असता नमूद पती-पत्नीनी उलट अश्लील जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, सपोनि गायकवाड, फौजदार पाटील यांनी या अधिकाऱ्या भेटी देऊन अधिक माहिती घेतली. पुढील तपास सुरु आहे.