मामानेच केला भाचीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:18 AM2018-02-06T05:18:33+5:302018-02-06T05:18:45+5:30
शिक्षणासाठी घरात राहणा-या भाचीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी सख्ख्या मामासह, मामी आणि त्यांच्या दोन मुलांवर मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोलापूर : शिक्षणासाठी घरात राहणा-या भाचीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी सख्ख्या मामासह, मामी आणि त्यांच्या दोन मुलांवर मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित तरुणीचे वडील मृत असून, ती महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येळेगाव येथील मामाकडे राहत होती. आई आबुधाबी येथे कामास गेली आहे. मामा इलाही हसन नदाफ व त्याची मुले महिबूब आणि सैफन यांनी नोव्हेंबर २०१६पासून छळ सुरू केला. जिवे मारण्याची वारंवार धमकी देत असत. महिबूब आणि सैफन यांनी दोन वर्षांपूर्वी आळी-पाळीने बलात्कार केला. हा प्रकार मामा इलाहीस सांगितला असता, त्यांनीही अत्याचार केला. मामीने याकामी त्यांना मदत केली, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर चौघांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील ईलाही नदाफ, महिबूब नदाफ, सैफन नदाफ यांना एका तासात येळेगाव येथून अटक करण्यात आली.