चुंगीच्या वाचनलायाकडे दुर्मीळ ग्रंथसंपदा सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:25 AM2021-08-28T04:25:49+5:302021-08-28T04:25:49+5:30
प्रतिष्ठानकडे कवी रा. ना. पवार यांना तत्कालीन कवी, लेखक आणि साहित्यिकांनी अनेक ग्रंथ भेट दिलेले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब ...
प्रतिष्ठानकडे कवी रा. ना. पवार यांना तत्कालीन कवी, लेखक आणि साहित्यिकांनी अनेक ग्रंथ भेट दिलेले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजग्रह निवासस्थानाला भेट दिल्यानंतर बाबासाहेबांनी विकसित केलेले आपले समृद्ध ग्रंथालय पवार यांना स्वतः दाखवले. त्यातील काही पुस्तके भेट दिली आणि ग्रंथसंग्रह करण्याचा सल्ला दिला होता. त्याचे तंतोतंत पालन करीत कवी रा. ना. पवार यांनी जीवनभर पुस्तकांचा संग्रह केला. ही ग्रंथसंपदा योग्य ठिकाणी जावी, वाचकांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी माधव पवार यांचा प्रयत्न आहे. चुंगीच्या सार्वजनिक वाचनालयाला यातील दर्जेदार ग्रंथ देण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव पवार यांनी उत्कर्ष वाचनालयाचे संचालक बालाजी माने यांच्याकडे ही ग्रंथसंपदा सोपवली. यावेळी हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत येळेगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी, दत्ता थोरे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
.................
फोटो ओळी रा.ना. प्रतिष्ठानच्या वतीने चुंगीच्या उत्कर्ष वाचनालयाकडे ग्रंथ संपदा सुपूर्द करताना माधव पवार, श्रीकांत येळेगावकर, पद्माकर कुलणकर्णी, दत्ता थोरे, प्रशांत गायकवाड.
.......
(फोटो २७पवार प्रतिष्ठान