उजनीत आढळला दुर्मिळ सोनेरी कासव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:01+5:302020-12-07T04:16:01+5:30

जगभरातून दुर्मिळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंदापूर तालुक्‍यात भिगवणजवळ डिकसळ येथे ...

Rare golden turtle found in Ujjain | उजनीत आढळला दुर्मिळ सोनेरी कासव

उजनीत आढळला दुर्मिळ सोनेरी कासव

Next

जगभरातून दुर्मिळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंदापूर तालुक्‍यात भिगवणजवळ डिकसळ येथे मासेमारी करताना सापडले आहे. सामान्य कासवांपेक्षा इंडियन स्टार कासव सुंदर, असामान्य व मनमोहक हे त्याचे वैशिष्ट्य. त्याच्या बाह्य कवचावर तारांप्रमाणे दिसणारे मनमोहक सोनेरी रंगाचे सप्तर्षी ठिपके आहेत.

कासवांच्या प्रजातीमध्ये इंडियन स्टार जातीच्या कासवाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटात तसेच पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका या देशांत ड्राय झोन भागात आढळतो. भारतात आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल येथे असे कासव आढळून आल्याच्या नोंदी आहेत.

अंधश्रद्धा, घरात फेंगशुई, जादूटोणा, औषध निर्मिती आदी कारणांसाठी या कासवांची तस्करी जागतिक पातळीवर चालते.

---

सोनेरी पहाट पण...

उजनीत मासेमारी करणारे विनोद अभिलाल काळे व त्यांची पत्नी शिवानी हे दोघे नेहमीप्रमाणे उजनी पाणलोट क्षेत्रात डिकसळ भागात पहाटे मासेमारीसाठी गेले होते. या वेळी उगवत्या सूर्य किरणांमध्ये त्यांना चमकणारी वस्तू दिसली. त्यामुळे मोठ्या कुतूहलाने जवळ जाताच त्यांनी आजपर्यंत कधीच पाहिले नसलेले कासव दिसले. त्यांना हे कासव दुर्मिळ असल्याची जाणीव झाली. वास्तविक, तस्करीचा विचार मनात आला असता तर ही पहाट त्यांना सोनेरी ठरली असती. मात्र, तसे न करता त्यांनी हे कासव वनविभागाच्या ताब्यात दिले

--

पाठीवर नक्षत्रांचा आलेख असलेले नजाकतदार कासव आशिया खंडातील भारतीय उपखंडातच आढळते. या कासवांचा वावर पाकिस्तानात सिंध प्रांत, पश्‍चिमेकडे बंगाल प्रांतापर्यंत व दक्षिणेत श्रीलंकापर्यंत तुरळकपणे पाहायला मिळतो. दुर्मिळ प्रजातीचे हे कासव उजनीच्या पोटात आढळल्याने धरण पाणलोट क्षेत्रात जैवविविधता अतुलनीय असल्याचे स्पष्ट होते..

- प्रा. डॉ. अरविंद कुंभार

ज्येष्ठ पर्यावरण निरीक्षक

--

फोटो : ०६ करमाळा कासव

उजनीत आढळलेले सोनेरी कासव दाखवताना विनोद काळे व पत्नी शिवानी काळे.

Web Title: Rare golden turtle found in Ujjain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.