केत्तूर शिवारात दुर्मीळ पाणमांजराचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:53+5:302020-12-29T04:21:53+5:30

गेल्याच महिन्यात जगभरातून दुर्मीळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनी जलाशयाच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच कोंढारचिंचोलीजवळील डिकसळ (ता. ...

Rare water cat sighting in Kettur Shivara | केत्तूर शिवारात दुर्मीळ पाणमांजराचे दर्शन

केत्तूर शिवारात दुर्मीळ पाणमांजराचे दर्शन

Next

गेल्याच महिन्यात जगभरातून दुर्मीळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनी जलाशयाच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच कोंढारचिंचोलीजवळील डिकसळ (ता. इंदापूर) येथे मासेमारी करणाऱ्या दाम्पत्यास सापडले होते. पुढे त्यांनी ते वन विभागाच्या ताब्यातही दिले होते.

सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान जलाशयाजवळील शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी सोमनाथ जरांडे हा युवक गेला होता. त्याला अचानक एक वेगळाच प्राणी दिसला. साधारणपणे एक ते दीड फूट उंचीचा व तीन फूट लांबी असणारा हा काळ्या रंगाचा, त्याच्या तोंडावर मोठ्या मिशाही होत्या, असा हा आगळावेगळा प्राणी पाण्याबाहेर आला होता. आवाजाने भीतीपोटी तो पुन्हा पाण्यात गेला. १० ते १२ फूट अंतरावर पाण्याबाहेर डोके काढून पोहू लागला. प्राणी अभ्यासकांना त्याचा फोटो पाठवला असता, तो प्राणी दुर्मीळ होत चाललेले पाणमांजर असल्याचे सांगितले.

उजनी जलाशय परिसरात प्रथमच दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या पाणमांजराचे अस्तित्व असल्याचे दिसून आले व त्यामुळे उजनीची ‘जैवविविधता''ही समोर आली आहे.

----

तस्करीमुळे घटतेय संख्या

पाणमांजराचे प्रमुख खाद्य मासे, खेकडे व गोगलगायी हे आहे. वाढते प्रदूषण, पाणथळ जागा नष्ट होणे, शिकार, अनियंत्रित मासेमारी, माशांची कमतरता यामुळे या प्राण्याचे अस्तित्व सध्या तरी धोक्‍यात आले आहे. याच्या कातडीचा उपयोग तस्करीसाठी केला जात असल्याने पाणमांजरांची संख्या वरचेवर कमी होत आहे.

-----काय म्हणतात पर्यावरण अभ्यासक

पाणमांजर हा प्राणी लाजरा-बुजरा असल्याने सहसा कोणाच्याही दृष्टिक्षेपात येत नाही. जलाशयाशी संबंध असणाऱ्या लोकांनाच पाणमांजर कधीतरी तो दिसतो. पाणमांजराचे इंग्लिश नाव ‘ऑटर’ आहे. किनाऱ्यावर, दगडाच्या खाचा तसेच मोठ्या झाडाच्या मुळाशी विस्तीर्ण छायेत पाणमांजर राहते. नदीतील मासे, खेकडे, कासव, नदीतील साप, प्रसंगी जमिनीवरील पक्षी हे त्याचे खाद्य आहे. जलाशयात मोठ्या चपळाईने माशांचा पाठलाग करून मासे खातो. शक्‍यतो हे मांजर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते, असे ज्येष्ठ प्राणीशास्त्रज्ञ व पर्यावरण अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी सांगितले.

ज्येष्ठ प्राणीशास्त्रज्ञ व पर्यावरण अभ्यासक

----

कोट घेणे...

दुर्मीळ देशी - विदेशी पक्षी, प्राणी, जलचर यांचा अधिवास हे उजनी जलाशयासाठी भूषणावह बाब आहे. यासाठी या सर्वांचेच संवर्धन व संरक्षण होणे गरजेची बाब आहे.

- कल्याणराव साळुंके, पक्षीप्रेमी, कुंभेज

------२८करमाळा-पानमांजर

उजनी जलाशयाच्या काठावर केत्तूर शिवारात दुर्मीळ पाणमांजर आढळले.

Web Title: Rare water cat sighting in Kettur Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.