रतनचंद बँक अपहारप्रकरणी दोघांचे अटकपूर्व जामीन फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:40 AM2021-03-04T04:40:47+5:302021-03-04T04:40:47+5:30

हरिदास निवृत्ती राजगुरू (रा. कडलास रोड, सांगोला), अशोक भास्कर माळी (रा. शुक्रवार पेठ, टेंभुर्णी) यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज ...

Ratanchand rejects pre-arrest bail in bank embezzlement case | रतनचंद बँक अपहारप्रकरणी दोघांचे अटकपूर्व जामीन फेटाळले

रतनचंद बँक अपहारप्रकरणी दोघांचे अटकपूर्व जामीन फेटाळले

googlenewsNext

हरिदास निवृत्ती राजगुरू (रा. कडलास रोड, सांगोला), अशोक भास्कर माळी (रा. शुक्रवार पेठ, टेंभुर्णी) यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. अरविंद नाझरकर (रा. हजारे गल्ली, मंगळवेढा) यांनी टेंभुर्णी पोलिसांत अपहाराचा गुन्हा नोंदला होता.

दोघांनी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत कार्यरत असताना हातावरील शिल्लक रकमेमध्ये १ कोटी १४ लाख ८७ हजार ८२२ रुपये, २०१६ ते २०२० कालावधीत शाखेच्या बँक ऑफ इंडिया खात्यामधील १ कोटी ९२ लाख २५ हजार रुपये, बँकेच्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खात्यामधील २ कोटी ४९ लाख ९० हजार रुपये असा एकूण ५ कोटी ५७ लाख २ हजार ८२२ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बँकेच्या इतक्या मोठ्या रकमेची विल्हेवाट कशी लावली. रकमेचे काय केले. प्रत्यक्ष तपास होऊन रक्कम वसूल होणे गरजेचे आहे. अर्जदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद सरकारी वकील ॲड. प्रदीप बोचरे यांनी केला. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करून अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. बँकेच्या वतीने ॲड. सागर रोडे यांनी काम पाहिले.

Web Title: Ratanchand rejects pre-arrest bail in bank embezzlement case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.