रतनचंद शहा बँकेस दोन कोटींचा ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:09+5:302021-04-01T04:23:09+5:30
रतनचंद शहा सहकारी बँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने पार पडली. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी स्व. ...
रतनचंद शहा सहकारी बँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने पार पडली. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी स्व. रतनचंद शहा यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष रामचंद्र जगताप यांनी केले. सरव्यवस्थापक शामसुंदर कुलथे यांनी विषय वाचन तर अध्यक्ष राहुल शहा यांनी अहवाल वाचन केले. बँक ही सभासद, ठेवीदारांच्या सहकार्यानेच प्रगतीपथावर आहे. बँकेस सन २०१९-२० या कालावधीत राखीव निधीत ७२.४९ लाख वाढ होऊन तो २७ कोटी ७ लाख झाला. ठेवीमध्ये २९ कोटी ८५ लाख वाढ होऊन ठेवी २८४ कोटी इतक्या झाल्या. नेटवर्थ ७४ लाखाने वाढून २३ कोटी ४७ लाख झाले. तसेच बँकेचा नेट एन.पी.आर. ४.८३ टक्के असल्याचे राहुल शहा यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष रामचंद्र जगताप, संचालक मुझफ्फर काझी, महोदव माळी, बजरंग ताड ,अॅड. रमेश जोशी, लक्ष्मण नागणे, संतोष बुरकूल, छबाबाई दत्तू, बबिता गोवे, विधी सल्लागार अॅड. विनायक नागणे उपस्थित होते.