रेशनकार्डधारकांनो; या गोष्टी न केल्यास फेब्रुवारीपासून धान्य मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 05:14 PM2021-01-12T17:14:01+5:302021-01-12T17:14:07+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Ration card holders; If these things are not done, there will be no grain from February | रेशनकार्डधारकांनो; या गोष्टी न केल्यास फेब्रुवारीपासून धान्य मिळणार नाही

रेशनकार्डधारकांनो; या गोष्टी न केल्यास फेब्रुवारीपासून धान्य मिळणार नाही

Next

सोलापूर - शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंकींग करुन  वा. जे लाथार्थी मोबाईल आणि आधार क्रमांक लिंक करणार नाहीत त्यांना फेब्रुवारी महिन्यापासून धान्य मिळणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी कळवले आहे. 

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, शिधापत्रिकेत नोंद असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा योजनेतील ८२ टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहे.  मात्र काही लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बदलले आहेत त्यांनी आपले स्वस्त धान्य दुकानदार आणि परिमंडळ कार्यालय अ,ब,क,ड,येथे संपर्क साधून लिंकीग करुन घ्यावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: Ration card holders; If these things are not done, there will be no grain from February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.