रोज चार हजार रुपयांवर तरुणीला वेश्या व्यवसाय करायला लावणारी रजिया आन्टी अखेर गजाआड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:43 AM2018-12-15T11:43:26+5:302018-12-15T11:45:28+5:30
शास्त्रीनगर परिसरात कारवाई : भरवस्तीत चालायचा खुलेआम व्यापार; एकीस पोलीस कोठडी
सोलापूर : शास्त्रीनगर परिसरातील भारतरत्न इंदिरानगर येथील कुंटणखान्यावर धाड टाकून पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले. कुंटणखाना चालवणाºया महिलेस दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे तर तरूणीस महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
रजिया जाबीर शेख (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. रजिया शेख ही शास्त्रीनगर भागातील भारतरत्न इंदिरानगर येथील एका घरात राहते. तिने वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुंबई येथील एका तरूणीस गेल्या सात वर्षांपूर्वी सोलापुरात बोलावून घेतले होते. या तरूणीस सोलापुरातील काही हॉटेल्समध्ये गिºहाईकांकडे पाठविले जात होते. काही ग्राहक घरी येत होते, अशा पद्धतीने वेश्या व्यवसाय चालू होता.
हा प्रकार आजूबाजूला राहणाºया लोकांच्या लक्षात आल्यानंतर चर्चा होऊ लागली. याची कुणकुण सदर बझार पोलिसांना लागली़ पोलीस निरीक्षक संजय पवार यांना कळाली. त्यांनी ही माहिती पोलीस नाईक अर्चना भाऊसाहेब गवळी यांना सांगून कारवाई करण्यास सांगितले.
पोलीस नाईक अर्चना गवळी यांनी बोगस गिºहाईक तयार करून गुरूवारी सायंकाळी चार वाजता शास्त्रीनगर येथील भारतरत्न इंदिरानगर येथील रजीया शेख हिच्या घरी गेले. बोगस गिºहाईकाने रजीया शेख हिच्या घरात प्रवेश केला. तेथे २७ वर्षीय तरूणी वेश्या व्यवसाय करण्यासाठी बसली होती.
दरम्यान पोलिसांनी अचानक छापा टाकून तपासणी केली असता २७ वर्षीय तरूणी, घरकाम करणारी महिला व उसने पैसे परत मागण्यासाठी आलेली महिला अशा चौघीजणी आढळून आल्या. तरूणीस ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता तिला रजीया शेख हिने मुंबई येथून आणल्याचे सांगितले.
तिला वेश्या व्यवसायात दररोज ४ हजार ३00 रूपये देण्याचे ठरले होते, मात्र तिला काही पैसे दिले नसल्याचे तरूणीने सांगितले. घराची झडती घेतली असता साडेआठ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.