जिल्ह्यात ‘कोरोना’चा पुन्हा प्रवेश; सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे आढळला रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:36 AM2020-05-19T11:36:24+5:302020-05-19T11:36:58+5:30
जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पाचेगावात दाखल; क्वारंटाईन केलेला रूग्ण निघाला बाधित
ठळक मुद्देजिल्हा आरोग्य विभाग पूर्ण सतर्क झाला असून स्थलांतरित येणाºया लोकांवर लक्ष बाहेरून आलेल्या सर्व प्रवाशांना गावाजवळच्या शाळांमध्ये क्वारंटाईन सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सावळेश्वर, ढोक बाभूळगाव, घेरडी, उळे आदी ठिकाणी रुग्ण आढळले
सोलापूर: जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे ‘कोरोना’चा रुग्ण आढळला आहे.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सावळेश्वर, ढोक बाभूळगाव, घेरडी, उळे आदी ठिकाणी रुग्ण आढळले होते. सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे आढळलेला हा रुग्ण मुंबईहून पत्नी व दोन मुलीसह गावी परतला होता, पण त्याला राजुरी येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. तपासणी दरम्यान त्याला बाधा झाल्याचे आढळले आहे.
जिल्हा आरोग्य विभाग पूर्ण सतर्क झाला असून स्थलांतरित येणाºया लोकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. बाहेरून आलेल्या सर्व प्रवाशांना गावाजवळच्या शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे़ सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार हे आपल्या पथकासह पाचेगाव येथे दाखल झाले आहेत़