वाचा सविस्तर; कोणत्या कारणामुळे सोलापुरातील मंगल कार्यालयास मिळेना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 03:14 PM2020-06-24T15:14:59+5:302020-06-24T15:17:57+5:30

तोंडाने वाद्य वाजवणारे वाजंत्री मास्कचा कसा वापर करतील; महसूल विभाग करीत आहे गांभीर्याने अभ्यास

Read detailed; For what reason did not get permission to the Mars office in Solapur | वाचा सविस्तर; कोणत्या कारणामुळे सोलापुरातील मंगल कार्यालयास मिळेना परवानगी

वाचा सविस्तर; कोणत्या कारणामुळे सोलापुरातील मंगल कार्यालयास मिळेना परवानगी

Next
ठळक मुद्देलग्नकार्य म्हंटले की अजून वाजंत्री आलेच. लग्नासाठी ५० व्यक्तींना परवानगी दिलीफिजिकल डिस्टन्स सॅनिटायझर  व मास्कचा वापर करण्याच्या अटीवर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली हॉटेल वगळता बाजारपेठेतील विविध प्रकारची दुकाने सुरू झाली आहेत

सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आदेश देऊन सुद्धा मंगल कार्यालयाला परवानगी देण्याचे काम अडले आहे, ही परवानगी देताना वाजंत्रीना मास्क वापरण्याची अट कशी घालायची असा अधिकाºयांना प्रश्न पडला आहे.

राज्यात एक जूनपासून टाळेबंदीच्या अटी शिथिल करून विविध व्यवसायांना फिजिकल डिस्टन्स सॅनिटायझर  व मास्कचा वापर करण्याच्या अटीवर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे हॉटेल वगळता बाजारपेठेतील विविध प्रकारची दुकाने सुरू झाली आहेत. प्रशासनाने ५० व्यक्तींचे उपस्थित लग्नकायार्साठी परवानगी दिली आहे. लग्नकार्य व सर्व व्यापार सुरु झाल्याने मंगल कार्यालय व सलून व्यवसायिकांनीही व्यवसायाला परवानगी द्यावी म्हणून आग्रह धरला आहे. पालकमंत्री धरणे यांनी ही मंगल कार्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगल कार्यालय इतर ठिकाणी कशा पद्धतीने परवाने देण्यात आले याचा अभ्यास करण्याच्या अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर अधिकाºयांनी मंगल कार्यालयासाठी कोणत्या अटी घालायच्या याचा अभ्यास सुरु केला आहे.

लग्नकार्य म्हंटले की अजून वाजंत्री आलेच. लग्नासाठी ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. मग यात वाजंत्री गृहीत धरायचे का? तोंडाने वाद्य वाजवणारे वाजंत्री मास्कचा कसा वापर करतील. त्यांना सवलत देण्यासाठी नियमात तरतूद आहे का? तशी सवलत दिली तर विषाणूचा संसर्ग होणार नाही ना? याबाबत माहिती घेतली जात आहे. वाजंत्रीचा त्यांच्या वाद्य वाजविण्याच्या व्यवसायावर चरितार्थ चालतो, त्यामुळे त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी म्हटले आहे. या अडचणीमुळे तुर्तास मंगल कार्यालयास परवानगी देण्याचा विषय लांबला आहे.

Web Title: Read detailed; For what reason did not get permission to the Mars office in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.