झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी कोणी कोणाला मतदान केले वाचा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:25 PM2020-01-01T14:25:55+5:302020-01-01T14:27:01+5:30
कोणाचा गट कुणाकडे: राष्ट्रवादी काँग्रेसचे गणित चुकले कुठे पहा
सोलापूर: जिल्हा परिषदत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अन शिवसेना महाआघाडीचे बहुमत असतानाही भाजप नेत्यांसोबत मोहिते—पाटील गटाने शरद पवारांना धक्का देण्याचे तंत्र यशस्वी केले. काँग्रेस अन शिवसेनेचे सदस्य फोडून मोहिते—पाटील गटाचे अनिरूद्ध कांबळे अध्यक्ष तर आवताडे गटाचे दिलीप चव्हाण उपाध्यक्ष कसे झाले हे खालील मतदानाच्या आकडेवारीवरून लक्षात येईल.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली़ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडी आणि भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीच्या उमेदवारात सरळ लढत झाली. भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अनिरूद्ध कांबळे (केम, ता. करमाळा) व राष्ट्रवादीचे त्रिभुवन धार्इंजे (वेळापूर, ता. माळशिरस) तर उपाध्यक्ष पदासाठी दिलीप चव्हाण (भोसे, ता. मंगळवेढा) व बाळराजे पाटील (अनगर, ता. मोहोळ) यांच्यात लढत झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जाधव यांनी आडनावाच्या आद्याक्षरानुसार मतदानासाठी रचना केली. त्यात पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी कांबळे यांचे नाव आले.
अध्यक्षपदासाठी झालेले मतदान पुढीलप्रमाणे आहे.
अनिरूद्ध कांबळे: शिवानंद पाटील (अपक्ष), सुभाष माने (विकास आघाडी), विजयराज डोंगरे (मोहोळ, भीमा आघाडी), अनिरूद्ध कांबळे (शिवसेना), तानाजी खताळ (भीमा आघाडी), किरण मोरे (भाजप), शीला शिवशरण, मंजुळा कोळेकर (दोघी मंगळवेढा जनहित आघाडी), सुनंदा फुले, स्वरूपाराणी मोहिते—पाटील (दोघी राष्ट्रवादी), शैला गोडसे (भीमा आघाडी), संगीता डोईफोडे, अण्णाराव बाराचारे, मदन दराडे, आनंद तानवडे (सर्व भाजप), दिलीप चव्हाण(जनहित आघाडी) , गोविंद जरे, अतुल पवार (सांगोला महायुती), सविता गोसावी, शीलवंती भासगी, मंगल कल्याणशेट्टी, प्रभावती पाटील, रुक्णिमी ढोणे, शोभा वाघमोडे (सर्व भाजप), लक्ष्मी आवटे, सविता राजेभोसले (दोघी शिवसेना), मंगल वाघमोडे, शीतलदेवी मोहिते—पाटील, रजनी देशमुख, अरुण तोडकर (सर्व राष्ट्रवादी) , ज्योती पाटील, साक्षी सोरटे, संगीता मोटे (सर्व भाजप), गणेश पाटील (राष्ट्रवादी), वसंतराव देशमुख (पंढरपूर विकास आघाडी), मल्लिकार्जुन पाटील, नीलकंठ देशमुख (दोघे शिवसेना).
त्रिभुवन धार्इंजे: संजय गायकवाड (काँग्रेस), बाळराजे पाटील, श्रीमंत थोरात, शिवाजी सोनवणे (सर्व राष्ट्रवादी), सचिन देशमुख (सांगोला आघाडी), बळीराम साठे, उमेश पाटील (दोघे राष्ट्रवादी), दादासाहेब बाबर (सांगोला आघाडी), रणजितसिंह शिंदे (राष्ट्रवादी), उषा सुरवसे, स्वाती शटगार (दोघी काँग्रेस), ऋतुजा मोरे (राष्ट्रवादी), स्वाती कांबळे, संगीता धांडोरे, अनिल मोटे (सांगोला आघाडी), रेखा गायकवाड (काँग्रेस), अतुल खरात, भारत शिंदे, त्रिभुवन धार्इंजे (सर्व राष्ट्रवादी) नितीन नकाते (काँग्रेस), रेखा राऊत, राणी वारे, रोहिणी ढवळे, अंजनादेवी पाटील, रोहिणी मोरे, शुभांगी उबाळे, रेखा भूमकर, विद्युलता कोरे (सर्व राष्ट्रवादी, अमर पाटील (शिवसेना).
दिलीप चव्हाण: शिवानंद पाटील, सुभाष माने, विजयराज डोंगरे, अनिरूद्ध कांबळे, तानाजी खताळ, किरण मोरे, शीला शिवशरण, मंजुळा कोळेकर, सुनंदा फुले, स्वरूपाराणी मोहिते—पाटील, शैला गोडसे, संगीता डोईफोडे, अण्णाराव बाराचारे, मदन दराडे, आनंद तानवडे, दिलीप चव्हाण, गोविंद जरे, अतुल पवार, सविता गोसावी, शीलवंती भासगी, मंगल कल्याणशेट्टी, प्रभावती पाटील, रुक्मिणी ढोणे, शोभा वाघमोडे, लक्ष्मी आवटे, सविता राजेभोसले, मंगल वाघमोडे, शीतलदेवी मोहिते—पाटील, रजनी देशमुख, अरुण तोडकर, ज्योती पाटील, साक्षी सोरटे, संगीता मोटे, गणेश पाटील, वसंतराव देशमुख.
बाळराजे पाटील: संजय गायकवाड, बाळराजे पाटील, श्रीमंत थोरात, शिवाजी सोनवणे, सचिन देशमुख, बळीराम साठे, उमेश पाटील, दादासाहेब बाबर, रणजिंतसिंह शिंदे, उषा सुरवसे, स्वाती शटगार, ऋतुजा मोरे, स्वाती कांबळे, संगीता धांडोरे, अनिल मोटे, रेखा गायकवाड, अतुल खरात, भारत शिंदे, त्रिभुवन धार्इंजे, मल्लिकार्जुन पाटील, नितीन नकाते, रेखा राऊत, राणी वारे, रोहिणी ढवळे, अंजनादेवी पाटील, रोहिणी मोरे, शुभांगी उबाळे, रेखा भूमकर, विद्युलता कोरे, अमर पाटील, नीलकंठ देशमुख.