वाचन संस्कृती लोप पावत चालली : नानासाहेब लिगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:12+5:302021-04-06T04:21:12+5:30

सांगोला तालुका साने गुरुजी कथामालेच्या वतीने सांगोला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ...

Reading culture is disappearing: Nanasaheb Ligade | वाचन संस्कृती लोप पावत चालली : नानासाहेब लिगाडे

वाचन संस्कृती लोप पावत चालली : नानासाहेब लिगाडे

googlenewsNext

सांगोला तालुका साने गुरुजी कथामालेच्या वतीने सांगोला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षक गटातून उमेश महाजन (केसकरवाडी-महूद) व ज्योती पवार (हातीद) यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान केला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व माणदेशी जनसेवक भाई जगन्नाथराव लिगाडे हा चरित्रग्रंथ देऊन सन्मानित केले. माध्यमिक शिक्षक गटातून मनोज माने (जवाहर विद्यालय, घेरडी), प्राचार्या समीरा फर्नांडिस (सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर) यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

यावेळी सिंहगड शैक्षणिक संकुलाचे संचालक अशोक नवले, श्रीमती काशीबाई नवले बी.एड. कॉलेजचे प्राचार्य साजिकराव पाटील, तालुकाध्यक्ष रामदास भोसले, कोषाध्यक्ष सोमनाथ ढोले, कार्यवाह सुनील लिगाडे, शिवाजी बंडगर, बापूसाहेब भंडगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रामदास भोसले यांनी केले. सूत्रसंचालन भीमाशंकर पैलवान यांनी केले, तर उद्धव पांचाळ यांनी आभार मानले.

फोटो ओळ :::::::::::::::::::

सांगोला तालुका सानेगुरुजी कथामालेच्या वतीने गुणवंत शिक्षक हा पुरस्कार उमेश महाजन यांना प्रा. नानासाहेब लिगाडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Reading culture is disappearing: Nanasaheb Ligade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.