खेडगी विद्यालयात वाचनदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:08+5:302021-06-21T04:16:08+5:30
अक्कलकोट : सी. बी. खेडगी कॉलेजमधील ग्रंथालय समिती व फोरमच्यावतीने शनिवारी केरळच्या वाचन चळवळीचे प्रणेते पी. एन. ...
अक्कलकोट : सी. बी. खेडगी कॉलेजमधील ग्रंथालय समिती व फोरमच्यावतीने शनिवारी केरळच्या वाचन चळवळीचे प्रणेते पी. एन. पनीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘वाचन दिन’ कार्यक्रम गुगल ऑनलाईन प्रणालीद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. संध्या परांजपे होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय फुलारी, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य, ग्रंथपाल प्रा. आर. आर. कांबळे उपस्थित होते.
डॉ. कलशेट्टी म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’, ‘शिकाल तर टिकाल’, ‘ज्ञानाची पाहिजे खात्री, तर पुस्तकांशी करा मैत्री’ असे आवाहन यावेळी केले. सूत्रसंचालन प्रा. संध्या इंगळे यांनी केले तर डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी यांनी आभार मानले.