रियल इस्टेट बाजारपेठेत उठावाचे पर्व सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 02:06 PM2017-09-15T14:06:33+5:302017-09-15T14:07:29+5:30

दोन वर्षांपासून मंदीचा मार झेलत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेमध्ये उठावाचे पर्व सुरू झाले आहे, असा दावा बिल्डर्सकडून केला जात आहे. घर खरेदीच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली नसली तरी स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणारे शहरवासीय गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी मोठ्या संख्येने करीत असल्याचे चित्र आहे.

Real estate market launches! | रियल इस्टेट बाजारपेठेत उठावाचे पर्व सुरू !

रियल इस्टेट बाजारपेठेत उठावाचे पर्व सुरू !

Next
ठळक मुद्देरिअल इस्टेटसाठी आता चांगला काळ सुरू घराचे स्वप्न पाहणाºयांनी आता तातडीने पावले उचलण्याचा काळप्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा घेण्याची संधी चांगली


रवींद्र देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : येत्या तीन महिन्यांपर्यंत अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीयांना मिळणारा प्रधानमंत्री आवास योजनेच्या व्याज अनुदानाचा लाभ, रिअल इस्टेट नियमन आणि विकास कायदा अर्थात ‘रेरा’ची स्पष्टता आणि तयार सदनिकांना वस्तू आणि सेवा कर लागू होणार नाही, हा फायद्याचा व्यवहार. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदीचा मार झेलत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेमध्ये उठावाचे पर्व सुरू झाले आहे, असा दावा बिल्डर्सकडून केला जात आहे. घर खरेदीच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली नसली तरी स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणारे शहरवासीय गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी मोठ्या संख्येने करीत असल्याचे चित्र आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झाला. या काळातच ‘जीएसटी’ आणि ‘रेरा’ कायदाही उंबरठ्यावर होता. त्यामुळे ग्राहकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. मंदीमुळे बेजार झालेल्या गृहनिर्माण उद्योगासाठी तर हा काळ अतिशय कठीण होता; पण महाराष्टÑ दिनी ‘रेरा’ची अंमलबजावणी झाल्यानंतर सरकारने आपल्या हिताची काळजी घेतल्याचे ग्राहकांना स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. 
शिवाय विक्रीसाठी तयार असलेल्या सदनिकांना ‘जीएसटी’लागणार नाही, हेही नंतर कळाले. त्यामुळे ही सकारात्मकता अधिकच वाढत गेली. प्रधानमंत्री आवास योजनेत ६ ते १८ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांना डिसेंबरपर्यंत व्याज अनुदान मिळण्याची संधी असल्यामुळे तर रिअल इस्टेट उद्योगातील मंडळींचा आत्मविश्वास अधिकच वाढत गेला. या सकारात्मकतेचा फायदा घेण्यासाठी बिल्डर्सकडूनच स्वस्तातील गृहकर्जाचे प्रस्ताव दिले जाऊ लागले; पण इतके फायदेशीर वातावरण असतानाही रिअल इस्टेटमध्ये एकदम उठाव आला नाही. हे पर्व आता कुठे सुरू झाले असल्याचे दिसत आहे.
‘क्रेडाई’चे राज्य उपाध्यक्ष सुनील फुरडे म्हणाले, आता मार्केट सुटलंय. सोलापूरसारख्या शहरात तयार असलेले फ्लॅट्स अगदी मोठ्या संख्येने नसले तरी गरजवंतांसाठी घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना ‘जीएसटी’चा भार पडणार नाही; पण नंतर मात्र घरांची किंमत १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. अन्य एका येथील प्रथितयश बिल्डरने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ग्राहकांकडून केवळ विचारणा होत असल्याचे सांगितले. ग्राहक चौकशी करून जातात; पण प्रत्यक्ष व्यवहार होत नाहीत.
-----------------
रिअल इस्टेटसाठी आता चांगला काळ सुरू झाला आहे. घराचे स्वप्न पाहणाºयांनी आता तातडीने पावले उचलण्याचा काळ आहे. तयार सदनिका उपलब्ध असल्यामुळे त्यांना ‘जीएसटी’चा फटका बसणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा घेण्याची संधी चांगली आहे. सोलापुरातील ९० टक्के ग्राहक या योजनेसाठी पात्र होऊ शकतात.
- नंदकुमार मुंदडा, 
अध्यक्ष, ‘क्रेडाई’ सोलापूर शाखा.

Web Title: Real estate market launches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.