चार महिन्यांचे वेतन मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:43+5:302021-04-30T04:27:43+5:30
बार्शी : कोरोना महामारीच्या काळात पोलीस कर्मचारी जिवाची पर्वा न करता जनतेच्या संरक्षणासाठी काम करतात त्याप्रमाणेच त्यांच्या खांद्याला ...
बार्शी : कोरोना महामारीच्या काळात पोलीस कर्मचारी जिवाची पर्वा न करता जनतेच्या संरक्षणासाठी काम करतात त्याप्रमाणेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेले होमगार्ड यांचे चार महिन्याचे वेतन अदा न केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील होमगार्डच्या वेतनासाठी ६० कोटीची तरतूद करूनही होमगार्ड वेतनपासून वंचित आहेत.
याबाबत होमगार्डनी ‘लोकमत’शी आपली व्यथा मांडताना म्हणाले अनेक होमगार्डना इतर उत्पनाची साधने नाहीत. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर जगावे कसे असा प्रश्न उभारला आहे.
सध्या बार्शी शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन व तालुक्यातील पांगरी व वैराग आशा चार पोलीस स्टेशनमध्ये १०० होमगार्ड आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना नोव्हे, डिसेंबर व डिसेंबर २०२० व जानेवारी २१, मार्च २१ या चार महिन्यांचे वेतन मिळालेले नाही.