२४५ शाळेतील ३१ हजार विद्यार्थ्यांसाठी एक लाख ५२ हजार पाठ्यपुस्तके प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:01+5:302021-09-18T04:24:01+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. असे असतानाही ...
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु विद्यार्थ्यांजवळ पाठ्यपुस्तकेच नसल्यामुळे पुढील शिक्षण घेणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. गटशिक्षणाधिकारी पी.के. लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी पुस्तके एकत्र करून काही शाळांतील विद्यार्थ्यांना वितरण करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुविधा केली होती. मात्र जे विद्यार्थी पाठ्यपुस्तकाच्या प्रतीक्षेत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.
२४५ शाळांना मिळणार पाठ्यपुस्तके
सदर मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत तालुक्यातील वर्ग १ ते ८ च्या तब्बल ३१ हजार ५३६ विद्यार्थ्यांना याचा लाभ होतो. तालुक्यात एकूण २४५ शाळांमध्ये १८३ झेडपी शाळा, नगरपालिका आठ शाळांसह ५६ खासगी अनुदानित शाळांना पुस्तके वितरित होत आहेत, अशी माहिती विस्तार अधिकारी बजरंग पांढरे यांनी दिली.
कोट :
केंद्र शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके वितरित करायला वाहन उपलब्ध झाले आहे. दोन दिवसात सर्व केंद्र शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचतील. मंगळवारपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पोहोचतील असे नियोजन केले आहे.
- बजरंग पांढरे
शिक्षण विस्तार अधिकारी, मंगळवेढा
कोट :
केंद्रस्तरावरून शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके उपलब्ध होताच तत्काळ विद्यार्थ्यांना वाटप केली जातील. मोफत पाठ्यपुस्तकाची तीन महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे.
- सुनीता औताडे
मुख्याध्यापिका, नूतन मराठी विद्यालय
फोटो ओळी-- मंगळवेढा येथून केंद्रस्तरावर पुस्तके पाठविताना गटशिक्षणाधिकारी पी. के. लवटे, विस्ताराधिकारी बजरंग पांढरे, भारत केंगार.
170921\img-20210917-wa0036-01.jpeg
फोटो ओळी-- मंगळवेढा येथून केंद्रस्तरावर पुस्तके पाठविताना गटशिक्षणाधिकारी पि के लवटे, विस्ताराधिकारी बजरंग पांढरे , भारत केंगार