भीमा सीना जोड कालव्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:25 AM2021-09-26T04:25:24+5:302021-09-26T04:25:24+5:30
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बॅरेज येथून भीमा सीना जोड कालव्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी आ. ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बॅरेज येथून भीमा सीना जोड कालव्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. त्याला जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे.
कृष्णा पाणी तंटा लवाद-१ नुसार उपलब्ध असलेल्या पाणी वापराचे नियोजन झाले आहे. तसेच लवाद-२ चा निर्णय अद्याप अधिसूचित झाला नाही. प्रस्तावित योजनेंतर्गत भीमा नदीतील पुराचे पाणी सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे. यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त करणे गरजेचे आहे, अशी मागणी आ. देशमुख यांनी केली होती. या मागणीला यश आले असून, जलसंपदा विभागाने संबंधित योजनेच्या मुख्य अभियंता यांना पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र द्यावे, असे आदेश दिले आहेत.