नव्या, दुरुस्तीच्या १० योजनांना मान्यता

By admin | Published: June 15, 2014 12:24 AM2014-06-15T00:24:37+5:302014-06-15T00:24:37+5:30

जलव्यवस्थापन बैठक : गुडेवार यांच्या सूचना

Recognition of 10 new, repair plans | नव्या, दुरुस्तीच्या १० योजनांना मान्यता

नव्या, दुरुस्तीच्या १० योजनांना मान्यता

Next


सोलापूर: जलयुक्त गाव योजना व ए.आर.एफ. (वार्षिक दुरुस्ती निधी) योजनेतून १० गावांच्या कामांना जलव्यवस्थापन समितीने मंजुरी दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली.
जलयुक्त गाव योजनेंतर्गत माळेवाडी (माळशिरस) साठी दोन कोटी ४९ लाख, खवासपूर (सांगोला) साठी ८१ लाख ७२ हजार, ज्योतिबाचीवाडीसाठी ६२ लाख ४ हजार तर वागदरीसाठीच्या एक कोटी ६९ लाख रुपये खर्चाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. वार्षिक दुरुस्ती निधी (ए.आर.एफ.) मधून हुलजंतीसाठी ७ लाख ११ हजार, विंचूरसाठी ११ लाख ९० हजार, बालाजीनगरसाठी ८ लाख ३७ हजार १५५ रुपये, वाकावसाठी १२ लाख ४ हजार ६९८ रुपये, सापटणे (टे) साठी ११ लाख ३१ हजार ९३० रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. वृक्षलागवडीच्या नियोजनाची माहिती सीईओ गुडेवार यांनी विचारली. झाडे लागवडीची १० टक्के तपासणी केली का?, असे त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांना विचारले. बैठकीला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
---------------------------------
खड्ड्याचे दफ्तर मागिवले
दरवर्षीच खड्डे खोदणे व झाडे लावण्यासाठी सामाजिक वनीकरण व अन्य विभागाकडून निधी खर्च केला जातो. मात्र खड्डे व झाडे दिसत नाहीत. शुक्रवारी बैठकीत सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्याने पटवर्धन कुरोली येथे सहा हजार खड्डे खोदल्याचे सांगितले. समाजकल्याणचे सभापती शिवाजी कांबळे यांनी बैठक सुरू असतानाच सरपंचांना मोबाईल लावला. सरपंचांनी खड्डेच खोदले नसल्याचे सांगितले. खरे काय?, असे विचारल्यानंतर त्या अधिकाऱ्याने पुन्हा दुसऱ्याच गावाचे नाव सांगितले. त्यानंतर प्रभारी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी मस्टर व खर्चाचे दफ्तर दाखविण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Recognition of 10 new, repair plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.