‘ज्ञानदीप’मध्ये क्रॉप-सायन्स विषयाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:22 AM2021-03-16T04:22:58+5:302021-03-16T04:22:58+5:30

नांदोरे परिसरातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी पंढरपूर, भोसे, अकलूज अशा ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या रकमा व ...

Recognition of crop-science subject in ‘Gyandeep’ | ‘ज्ञानदीप’मध्ये क्रॉप-सायन्स विषयाला मान्यता

‘ज्ञानदीप’मध्ये क्रॉप-सायन्स विषयाला मान्यता

Next

नांदोरे परिसरातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी पंढरपूर, भोसे, अकलूज अशा ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या रकमा व इतर खर्च मोजावे लागत होते. हा प्रकार थांबावा यासाठी ‘ज्ञानदीप’चे अध्यक्ष किरण भिंगारे यांनी गावातच या अभ्यासक्रमाला मान्यता मिळविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. ही मान्यता मिळाल्याने सर्व स्तरातून कॉलेजचे कौतुक होत आहे. यासाठी प्रा. हेमंत कदम, प्रा. मारुती नरळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सचिव उमेश कदम, प्रा. प्रदीप माळी, अमोल मस्के, कुंडलिक तळेकर, गोपाळकृष्ण पुजारी, दीपाली थिटे, नसरीन तांबोळी व शिक्षक यांनीही काम पाहिले.

कोट :::::::::::::::::::::

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व बारावीनंतर पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुलभ व्हावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून ग्रामीण भागात नांदोरे येथे ज्ञानदीप ज्युनिअर कॉलेजमध्ये आम्ही क्रॉप-सायन्स विषयास मान्यता मिळविली आहे. ग्रामीणसह शहरी भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

- किरण भिंगारे

अध्यक्ष, ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, नांदोरे.

Web Title: Recognition of crop-science subject in ‘Gyandeep’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.