गाळमुक्त योजनेतील ६५ कामे रद्द करण्याची शिफारस, जिल्हाधिकारी म्हणाले अहवाल द्या
By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 17, 2024 12:19 PM2024-05-17T12:19:05+5:302024-05-17T12:19:31+5:30
गाळ मूक्त धरण अभियानाची बैठक
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुरु असलेली ६५ कामे रद्द करण्याची शिफारस संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. मंजूर कामे रद्द करण्यामागील कारणे काय आहेत, त्याचा अहवाल सादर करा , अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत केली. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाची जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५२ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातील ८१ कामे पूर्ण झालेली आहेत. सद्यस्थितीत २७ कामे सुरू आहेत. तर ७९ कामे सुरू झालेली नाहीत. जी कामे सुरू झाली नाहीत, ती कामे आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ सुरू करावीत, असेही निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख आदी उपस्थित होते.