महिन्यात विक्रमी २७ हजार कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:22 AM2021-04-02T04:22:40+5:302021-04-02T04:22:40+5:30

या महिन्यात पूर्ण तालुक्यात एकूण २७ हजार १०८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५०३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर १३ जणांचा ...

Record 27,000 corona tests per month | महिन्यात विक्रमी २७ हजार कोरोना चाचण्या

महिन्यात विक्रमी २७ हजार कोरोना चाचण्या

Next

या महिन्यात पूर्ण तालुक्यात एकूण २७ हजार १०८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५०३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर १३ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

या चाचण्यांमध्ये ॲन्टीजेन २२ हजार ८१७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १३६५ पॉझिटिव्ह निघाल्या. तर आरटीपीसीआरच्या ४ हजार २९१ चाचण्यांमध्ये १३८ पॉझिटिव्ह निघाल्या. यात ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण ४.१९ टक्के तर शहरी भागात हेच प्रमाण ७.६ टक्के एवढे आहे. या महिन्यात तालुक्यात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. गायकवाड यांनी सांगितले.

नगरपालिकेने केल्या ७६०६ जणांच्या चाचण्या

बार्शी शहरात चाचण्यांचे आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. नगरपालिकेच्यावतीने तब्बल ७ हजार ६०६ जणांच्या चाचण्या केल्या. यात व्यापारी व कामगारांच्या दुकानात जाऊन जागेवर टेस्ट केल्या जात आहेत. तर ग्रामीण भागात गौडगाव आणि चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक टेस्ट केल्या आहेत. कोविड केअर सेंटर आणि खासगी हॉस्पिटलमध्येही अनुक्रमे २ हजार ८३४ व १ हजार ५२६ टेस्ट केल्या. त्यातही ४४९ व २३७ जण १५ टक्क़्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

सर्दी-ताप-खोकला अंगावर नका काढू

बार्शी शहर मोठी व्यापारीपेठ आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात सतत गर्दी असते. नागरिक मास्क वापरत आहेत. तरी देखील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांनी स्वतःहून सामाजिक बांधिलकी जपत कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. सर्दी-ताप खोकला अशी लक्षणे दिसतात. ती अंगावर न काढता. तत्काळ टेस्ट करून हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत. जर आपण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला असाल तर आरोग्य यंत्रणेला तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी केले आहे.

---

चौकट मागील दोन दिवसात शहर व तालुक्यात १९७ जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी शहरात सात तर ग्रामीण मध्ये ४२ आणि बुधवारी शहरात ५० तर ग्रामीण मध्ये ४५ रुग्ण सापडले.

Web Title: Record 27,000 corona tests per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.