सोलापूर बाजार समितीत कांद्याची रेकॉर्ड ब्रेक उलाढाल, एका दिवसात शेतकºयांना मिळाले ११ कोटी ३३ लाख ८८ हजाराची कांद्याची पट्टी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 05:18 PM2017-12-16T17:18:08+5:302017-12-16T17:20:51+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी इतिहास घडला़ ५८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी इतिहास घडला़ ५८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला़ शनिवारी ५०९ ट्रकमधून १ लाख १ हजार ९२२ पिशव्या कांद्याची आवक झाली़ यामुळे बाजार समितीत शनिवारी १२ कोटी ५७ लाख ८१ हजार ७२५ रूपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी दिली़
दरम्यान, शनिवारी कांद्याला कमाल ४ हजार उच्चांकी दर मिळाला़ सुमारे ११ कोटी ३३ लाख ८८ हजार रूपये शेतकºयांना मिळाले़ शनिवारी ४ हजार रूपये दराने २७ क्विंटल तर २०० रूपये दराने १३ क्विंटल कांदा विक्री झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली़
मागील काही दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक होत आहे़ सोलापूर बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद आदी परिसरातून कांद्याची आवक होत आहे़ यंदा कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकºयांच्या चेहºयांवर समाधान दिसत आहे़ बाजार समितीत मागील काही दिवसांपूर्वी कांदा चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्यामुळे या चोºयांवर नियंत्रण मिळविण्यात बाजार समिती प्रशासनाला यश मिळाले असल्याची माहिती प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी दिली़