सोयाबीनला साडेसहा हजार विक्रमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:14+5:302021-04-08T04:22:14+5:30

बाजारात सध्या ज्वारीची देखील १५ ते २० हजार कट्टे आवक होत आहे. ज्वारीला २, ३, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल ...

Record price of six and a half thousand for soybean | सोयाबीनला साडेसहा हजार विक्रमी भाव

सोयाबीनला साडेसहा हजार विक्रमी भाव

Next

बाजारात सध्या ज्वारीची देखील १५ ते २० हजार कट्टे आवक होत आहे.

ज्वारीला २, ३, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मधल्या काळात पडलेल्या पावसामुळे काही ज्वारी काळी पडली आहे. तरी चांगल्या ज्वारीला अधिक दर मिळत असल्याचे ज्वारीचे खरेदीदार सौदागर नवगिरे म्हणाले.

हरभऱ्याचीही आवक बऱ्यापैकी सुरू आहे. हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. यंदा चिंचेचे पीकही भरपूर असल्याने आवक वाढली आहे. सुरुवातीला दर १५ ते ३० हजार रुपये क्विंटल होते. मात्र आता दर खाली आले असून, चिंचेची ६ ते १२ हजारांपर्यंत विक्री होत आहे. चिंच जास्त असल्याने व बार्शीत चिंचोका पावडरीचे मोठ्या प्रमाणावर कारखाने असल्याने बार्शीत चिंचोका जास्त लागतो. चिंचोक्याची ७ ते १० हजार कट्टे आवक आहे; तर दर १४०० ते १५०० रुपये क्विंटल मिळत आहे.

--------

Web Title: Record price of six and a half thousand for soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.