विक्रमी चाचण्या.. लसीकरणात आघाडीमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:05+5:302021-06-06T04:17:05+5:30
७१ गावांना मिळाली कोरोनापासून मुक्ती लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित रुग्ण आढळून येण्याचे ...
७१ गावांना मिळाली कोरोनापासून मुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त होते. मृत्यूदर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. त्यामुळे लॉकडाऊन काळात नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. तरुणांच्या मृत्यूतही वाढ झाल्याने आबालवृद्धांनी कोरोना चाचणी व उपचारावर भर दिला. विक्रमी चाचण्या आणि लसीकरणातही आघाडी घेतल्याने बाधितांचा आकडा घसरला. यामुळे बार्शी तालुक्यात ७१ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
तालुक्यात कोरोना चाचणी विक्रमी झाल्या आहेत. लसीकरणातही तालुका आघाडीवर आहे. विशेषत: भानसळे, चिंचखोपन व हिंगणी आर या तीन गावात दोन्ही लाटेत एकही बाधित रुग्ण आढळला नसल्याचे गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी सांगितले.
लॉकडाऊन आणि शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याने बार्शी शहरासह ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात येत आहे, १३१ पैकी तब्बल ७१ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. अनेक गावं कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड रिकामे झाले आहेत,
---
ही आहेत ७१ गावे...
बेलगाव, काटेगाव, बोरगाव खु, धामणगाव आ, भानसळे, ताडसौंदने, अलीपुर, वालवड, गोडसेवाडी, उंबर्गे, कापशी, हिंगणी, शेलगाव मा, तांदुळवाडी, इंदापूर, येमाई तांडा, बोरगाव झा, ढोराळे, इर्ले, तुर्कपिपरी, भालगाव, गौडगाव, मिरझनपूर, राऊळगाव, आंबेगाव, निंबळक,जवळगाव नं 1, चिचखोपन, कासारी, आळजापूर, भांडेगाव,भोइंजे, श्रीप्तपिंपरी, तावरवाडी, रास्तापुर, शिराळे, पांढरी, झानपूर, फफाळवाडी, कदमवस्ती, घोळवेवाडी, ढेम्बरेवाडी, घारी, धोत्रे, वानेवाडी, जामगाव आ, नागोबाची वाडी, पाथरी, खामगाव, तावडी, पिंपळगाव दे, टोणेवाडी, झाडी, हिंगणी आर, जामगाव पा, पिंपरी आर, तांबेवाडी, यावली, चारे, राळेरास, कोरफळे, दडशिंगे, पिंपळगाव धस, रातजन, शेलगाव व्हळे, सौंदरे, गुळपोळी, तडवळे, इर्ले वाडी, सारोळे व गाडेगाव.
----
कोरोनापासून मूक्त झालेल्या तालुक्यातील ७१ गावात १५ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. लोकांनी शासनाचे नियम पाळल्यानेच हे शक्य झाले. या गावांचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा.
- डॉ. अशोक ढगे, तालुका आरोग्य अधिकारी
--
लग्न सोहळे थांबवले. गावात वेळोवेळी औषध फवारणी करून सर्वेक्षण करत ग्रामस्थांची तपासणी केली. त्यामुळे आमचा गाव कोरोनामुक्त झाला.
- शुभांगी नरखडे, सरपंच