ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आली लाल परी धावून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:19 AM2021-01-15T04:19:32+5:302021-01-15T04:19:32+5:30

मोहोळ तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या ७६ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींसह अन्य काही ठिकाणचे १७५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ...

Red fairy came running for Gram Panchayat elections! | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आली लाल परी धावून!

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आली लाल परी धावून!

Next

मोहोळ तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या ७६ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींसह अन्य काही ठिकाणचे १७५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ६३ ग्रामपंचायतींच्या ५५९ जागांसाठी एकूण १२३४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

दरम्यान, आज होणाऱ्या मतदानासाठी २१० मतदान केंद्राची सोय केली आहे. सहायक मतदान केंद्रे ३६ असून, एकूण २४६ मतदान केंद्रे उभारली आहेत.

या निवडणुकीसाठी १ लाख ३२ हजार २९५ इतके मतदार आहेत. यामध्ये ७० हजार ४३४ पुरुष, तर ६१ हजार ८६० महिला मतदार आहेत.

महसूल प्रशासनाने मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई, केंद्राध्यक्ष राखीव, सहायक केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष राखीव, मतदान अधिकारी, राखीव, शिपाई राखीव असे एकूण १६०४ कर्मचारी नियुक्त केले आहेत.

मतदान पेट्यांची व यंत्रेची ने-आण करण्यासाठी एकूण ३८ राज्य परिवहन महामंडळाच्या बस, तर २० खासगी वाहने ताब्यात घेतली आहेत. मतदान प्रक्रिया कशी पार पडावी यासाठी कर्मचाऱ्यांना दोन प्रशिक्षणे दिली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर वाटपासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके नेमली आहेत.

यासाठी निवडणूक अधिकारी राजशेखर लिंबारे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने, महसूल सहायक एल. एन. शेख, महेश कोटीवाले, योगेश अनंतकवळस, संजय गोटीवाले, मोईन डोणगावकर, मनोज पुराणिक हे अधिकारी परिश्रम घेत आहेत.

कोट ::::::::::

निवडणुकीचे हे राष्ट्रीय कार्य आहे. ते कर्तव्य आहे ते करावेच लागणार आहे. यासाठी सकाळीच घरातील संक्रांतीचा कार्यक्रम उरकून आम्ही या ठिकाणी आलो आहोत.

- शुभांगी अंकुश करंडे, शिक्षिका, इंचगाव, ता. मोहोळ

फोटो

१४मोहोळ निवडणूक०१

मकरसंक्रांतीचा सण असतानाही मतदान प्रक्रियेसाठी आपले कर्तव्य बजाविण्यासाठी जाताना इंचगाव येथील शिक्षिका शुभांगी अंकुश करंडे.

Web Title: Red fairy came running for Gram Panchayat elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.