फोनसाठी पैसै हवेत म्हणून पोस्टर घेऊन थांबला रीलस्टार; रिक्षावाल्या काकांनी एका झटक्यात दिले पाच हजार
By शीतलकुमार कांबळे | Published: October 12, 2023 07:32 PM2023-10-12T19:32:08+5:302023-10-12T19:32:13+5:30
सोशल मीडियावरील एन्फ्लुएन्सर लाइक्स वाढविण्यासाठी काहीही करू शकतात.
सोलापूर : नवी पेठेमध्ये एक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर हातात पोस्ट घेऊन फोन घेण्यासाठी पैशांची मदत मागत होता. त्याला अनेकांनी एक रुपयांपासून १०, २० रुपयांची मदत केली. त्यातच एका रिक्षावाल्याने क्षणाचा विलंब न लावता पाच हजार रुपये देऊ केले. या रिक्षावाल्या काकांचे दिलदारपणाचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे.
सोशल मीडियावरील एन्फ्लुएन्सर लाइक्स वाढविण्यासाठी काहीही करू शकतात. सोलापुरी व्ही लॉगर अभी याने असाच एक प्रयत्न केला. मला आयफोन घ्यायला पैसे पाहिजेत, कृपया मदत करा..आपलाच गरीब.. असा मेसेज त्या पोस्टरवर लिहिला होता. आयफोन हा सर्वात महाग मोबाइल असतो. तो खरेदी करण्यासाठी पैसैही खूप लागतात. त्यामुळे मदत करा. अनेक लोक जाताना ते पोस्टर पाहून हसत होते. लहान मुलांनी पैसै देत त्या मुलाची मदत केली.
अरमान पुरे होना पैसौ से बडी बात है..
एक रिक्षावाले काका त्या मुलाला पाहून थांबले. त्यांनी माहिती घेतली. हा मुलगा मदत मागत असून, मी माझ्या खुशीने पाच हजार रुपये त्याला देत आहे. किसी के अरमान पुरे होना बडी बात आहे. पाँच हजार रुपये अरमानो से बडे नहीं होते. मै सिर्फ बोल नहीं रहा हूँ सच मे देना चाहता हूँ. त्यावर त्या एन्फ्लुएन्सरने तुम्ही इतके बोललात हे खूप झाले असे म्हणत पैसे परत दिले.