पंढरपूरातील माघीवारी साठी जिल्हा प्रशासन सज्ज, प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती, भाविकांसाठी आवश्यक सेवासुविधा देण्यावर भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 06:50 PM2018-01-25T18:50:58+5:302018-01-25T18:52:46+5:30

पंढरपूर येथे माघी वारीचा सोहळा २८ जानेवारी २०१८ रोजी होत आहे. माघी वारीच्या सोहळ्यासाठी येणा-या वारकरी-भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा देण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांतधिकारी  सचिन ढोले यांनी दिली.

Regarding District Administration for the Maghwari, information of the District Collector, Sachin Dhole, emphasizing on providing the necessary services for the devotees. | पंढरपूरातील माघीवारी साठी जिल्हा प्रशासन सज्ज, प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती, भाविकांसाठी आवश्यक सेवासुविधा देण्यावर भर !

पंढरपूरातील माघीवारी साठी जिल्हा प्रशासन सज्ज, प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती, भाविकांसाठी आवश्यक सेवासुविधा देण्यावर भर !

googlenewsNext
ठळक मुद्दे    माघी वारी साठी येणा-या वारकरी व भाविकांची कोणत्याही  प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व संबधीत यंत्रणा कार्यरतयेणा-या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी व सुलभ शौचालयाची व्यवस्था संबधीत विभागाने येणा-या भाविकांची गैरसोय होणार नाही याबातच्या सुचना प्रांतधिकारी यांनी दिल्या .


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर  दि. २५ :   पंढरपूर येथे माघी वारीचा सोहळा २८ जानेवारी २०१८ रोजी होत आहे. माघी वारीच्या सोहळ्यासाठी येणा-या वारकरी-भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा देण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांतधिकारी  सचिन ढोले यांनी दिली.

    माघी वारी साठी येणा-या वारकरी व भाविकांची कोणत्याही  प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व संबधीत यंत्रणाना कार्यरत असून, वारीत वारकरी व भाविकांना सेवा सुविधा देण्यास प्रशासन व मंदीर समितीने प्राधान्य दिले आहे. भाविकांच्या स्वच्छतेची आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरपालीकेमार्फत  स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.65 एकर व पत्राशेड  येथे ३०० तात्पुरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. तसेच ६५ एकर येथे वारक-यांना २४ तास पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख विरेश प्रभु व अप्पर जिल्हाधिकारी एस.डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माघी यात्रेचे नियोजन करण्यात आल्याचे प्रांतधिकारी  सचिन ढोले यांनी सांगितले.

आरोग्य विभागामार्फत २४ तास वैद्यकीय सेवेसह फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. दर्शनमंडप येथे आय.सी.यु.सेंटरची सुरु करण्यात आले आहे. तसेच यात्रा कालावधीत आग्निशामन व्यवस्था करण्यात आली आहे.शहरातील नदी पात्र,प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर व इतर ठिकाणी स्वच्छतेसाठी मोहिम राबविण्यात येणार आहे.

मंदीर समितीमार्फत दर्शन रांगेसाठी तात्पुरती पत्राशेड उभारण्यात आली आहेत. मंदीर  व मंदीर परिसरात कायमस्वरुपी ६४ तसेच वारी कालावधीसाठी १० सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दर्शन रांगेत व मंडपात भाविकांसाठी मोफत चहाची  व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर दर्शन रांग, दर्शन मंडप व मंदीर परिसर  सातत्याने स्वच्छ करण्यात येणार आहे.

            सुरक्षतेसाठी तीन उपविभागीय अधिकारी, १० पोलीस निरिक्षक, ४० पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, १० महिला अधिकारी, ५०० पुरुष पोलीस कर्मचारी, २०० महिला पुलीस कर्मचारी,तीन बॉम्ब शोधक पथक,  एक एस.आर.पी. कर्मचारी, ६०० होम गार्ड तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी १० अधिकारी व १०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत.  एस.टी. महामंडळामार्फत सोलापूर जिल्हयातून १५० जादा बसेसचे  नियोजन करण्यात आले आहे. येणा-या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी व सुलभ शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महावितरण कंपनीने यात्रा कालावधीत ६५ एकर, नदी पात्रासह शहरात अखंडीत व सुरक्षित वीज पुरवठा करण्याबाबतच्या सुचना दिल्या. तसेच संबधीत विभागाने येणा-या भाविकांची गैरसोय होणार नाही याबातच्या सुचना प्रांतधिकारी यांनी दिल्या .

Web Title: Regarding District Administration for the Maghwari, information of the District Collector, Sachin Dhole, emphasizing on providing the necessary services for the devotees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.