‘त्या’ अनाथ मुलाचे बालआश्रयगृहात पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:18+5:302021-07-29T04:23:18+5:30

बार्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद असताना पावसात भिजत फिरत असलेल्या अदित्य धनाजी जाधव (वय- १५, रा. ...

Rehabilitation of 'that' orphan child in a children's home | ‘त्या’ अनाथ मुलाचे बालआश्रयगृहात पुनर्वसन

‘त्या’ अनाथ मुलाचे बालआश्रयगृहात पुनर्वसन

Next

बार्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद असताना पावसात भिजत फिरत असलेल्या अदित्य धनाजी जाधव (वय- १५, रा. वैराग) याची चौकशी केली असता त्याचे आई-वडील लहाणपणीच मयत झाल्याचे व त्याला कोणीही नातलग नसल्याचे चौकशीत उघड झाले.

बार्शी शहर पोलिसांच्या मदतीने त्याला सोलापुरातील बालआश्रयगृहात दाखल करण्यात आले.

हा अनाथ मुलगा पावसात फिरत असताना येथील जागरूक नागरिक राज नानावटे, महिला हवालदार सिंधूताई देशमुख व सामाजिक कार्यकर्त्यांना तो दिसला. त्यामुळे त्यास जवळ बोलावून त्याच्या कुटुंबाची चौकशी करताना त्याचे आई-वडील लहानपणीच मयत झाल्याचे सांगितले. ज्यादिवशी तो मिळाला त्यादिवशी त्याची राहण्याची व्यवस्था येथील राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालय येथे करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी या अनाथ मुलाच्या नातेवाइकांची चौकशी करण्याबाबत पोलिसांना सांगताच त्याचा चुलत मामा लखन शेंडगे बार्शीतील झाडबुके मैदान येथे राहत असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता त्याचे आई-वडील लहानपणीच मयत झाले असून त्याला जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत, शिवाय त्याचा सांभाळ करण्यासारखी माझी परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे गोसावी यांनी बार्शीचे संरक्षण अधिकारी अमोल राजेंद्र जमदाडे, महिला व बालविकास विभाग बार्शी यांच्यातर्फे या अनाथ मुलाचे सोलापूरच्या बालआश्रयगृहात बालकल्याण समिती सोलापूर यांच्या मदतीने दाखल केले.

-----

अनाथ मुलांची चाइल्ड हेल्पलाइनला कल्पना द्या

आपल्या आसपास अनाथ मुले दिसल्यास त्यांच्या पुनर्वसनाची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी समजून १०९८ या चाइल्ड हेल्पलाइन नंबरवर फोन करून सांगावे. त्यामुळे अशा अनाथ मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यास व एक चांगला समाज घडविण्यास मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.

----

फोटो : मुलाचा मामा शेंडगे, बार्शी महिला बालविकास अधिकारी अमोल जमदाडे, सपोनि ज्ञानेश्वर उदार व महिला कॉन्स्टेबल सिंधू देशमुख दिसत आहेत.

Web Title: Rehabilitation of 'that' orphan child in a children's home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.