ओढ्यात वाहून गेलेल्याच्या नातेवाईकांना प्रत्यकी चार लाख मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:17+5:302021-02-09T04:25:17+5:30
बार्शी बाजार समिती येथे तोलार म्हणून काम करणारे अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे १५ ऑक्टाबर रोजी काम संपवून ...
बार्शी बाजार समिती येथे तोलार म्हणून काम करणारे अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे १५ ऑक्टाबर रोजी काम संपवून यशवंतनगर येथून राणा कॉलनी येथील ओढ्यातून जाताना त्याचा तोल जाऊन पाण्यात वाहून तो मयत झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी शोध घेऊनही तपास लागत नव्हता. त्यामुळे त्याबाबत पोलिसात तक्रार दिली. मात्र याच्या प्रेताचा सांगाडा तुळजापूर रोडवरील ओढ्यातील एका काटेरी झाडास अडकल्याचे २ फेब्रुवारी दिसताच त्याच्या पत्नीने शर्टच्या रंगावरून ओळखले. शहर पोलिसानी पंचनामा करून जागेवरच शवविच्छेदन केले व त्यानंतर त्याबाबतचा अहवाल महसूल विभागास कळविताच त्यांच्या नातेवाईकांना ४ लाखाची आर्थिक मदत ट्रेझरी कार्यालयातून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.
निवृत्ती रंगनाथ ताटे वय ६५ रा.मुंगशी हे सुद्धा त्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नागझरी नदीला आलेल्या पुरात वाहून गेले होते. याबाबत त्याची नोंद पोलिसात केली होती. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, परंतु मिळाला नाही. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील वाळूज देगाव येथील पाण्यात त्याच्या प्रेताचा सांगाडा मिळाला. त्याची प्रक्रिया मोहोळ पोलिसानी केल्यानंतर तो त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात देऊन त्याचा अहवाल बार्शी महसूल विभागास कळविला होता.
त्यानंतर या दोन्ही मयताच्या नातेवाईकास बार्शी तहसील कार्यालयाकडून धनादेश देण्याची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होत आहे.