कत्तलीसाठी नेणाऱ्या गाईंची सुटका; दोन दगावल्या, पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:12 AM2021-03-30T04:12:19+5:302021-03-30T04:12:19+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांना काही प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे बारामतीहून उस्मानाबादकडे कत्तलीसाठी ...

Release of cows taken for slaughter; Two bets, five serious | कत्तलीसाठी नेणाऱ्या गाईंची सुटका; दोन दगावल्या, पाच गंभीर

कत्तलीसाठी नेणाऱ्या गाईंची सुटका; दोन दगावल्या, पाच गंभीर

Next

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांना काही प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे बारामतीहून उस्मानाबादकडे कत्तलीसाठी गाई जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्वत: धाराशिवकर, पोलीस निरीक्षक विनय बहिर व सहायक निरीक्षक महारुद्र परजणे हे माढा रोडवर तपासणीस थांबले.

यावेळी रात्री एक वाजता (एम. एच.१३ ए. एक्स २४०३) आयशर टेम्पो आला. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरीत्या क्षमतेपेक्षा जास्त १५ गाईंची दाटीवाटीने बसवून कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. गुलाब खाजूभाई शेख (वय ३०, रा. आसू ता. फलटण व रमजान सैफन शेख रा. मळद, ता. बारामती) हे या गाईंना उस्मानाबादकडे घेऊन जात होते. यावेळी पोलीस पथकांनी टेम्पो व १५ गाईसह १० लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक मुकुंद माळी यांनी वैराग पोलिसात माहिती दिली. अधिक तपास फौजदार राजेंद्र राठोड करीत आहेत.

---

गाई गोशाळेत दाखल

जप्त केलेल्या गाईंना बार्शीतील श्रीनवकार जैनसेवा गोवंश शाळेत दाखल केल्या आहेत. पैकी दोन गाई मृत झाल्या असून, पाच गंभीर आहेत. गाईंवर पशुवैद्यकीय अधिकारी अभिजीत पाटील उपचार करत असल्याचे गोशाळेचे चालक धन्यकुमार पटवा यांनी सांगितले.

Web Title: Release of cows taken for slaughter; Two bets, five serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.