कुकडी धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना नदी पात्रात सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:31+5:302021-08-12T04:26:31+5:30

सीना नदी काठावरील गावाला पाणी टंचाई आहे. करमाळा तालुक्यातील खडकी, आळजापूर, तरटगाव, बाळेवाडी, पोटेगाव, निलज, बोरगाव, खांबेवाडी, करंजे, भालेवाडी, ...

Release the overflow water from the Kukdi dam into the Sina river basin | कुकडी धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना नदी पात्रात सोडा

कुकडी धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना नदी पात्रात सोडा

Next

सीना नदी काठावरील गावाला पाणी टंचाई आहे. करमाळा तालुक्यातील खडकी, आळजापूर, तरटगाव, बाळेवाडी, पोटेगाव, निलज, बोरगाव, खांबेवाडी, करंजे, भालेवाडी, मिरगव्हाण, कोळगाव, हिवरे, बिटरगाव (श्री) या गावांना पिण्याचे पाणी नाही. जनावरांना पाणी नाही, पिके जळू लागली आहेत. पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरीही सीना नदीला पाणी आले नाही. कुकडी धरणातील ओव्हरफ्लो पाणी सीना नदीमध्ये ताबडतोब सोडावे अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा सुपनवर यांनी दिला.

यावेळी भाऊसाहेब खरात, लाला काळे, धनंजय मोरे, नाना नलवडे, झुंबर कावळे, पिंटू भागडे, संजय जाधव, नियमन गायकवाड, तात्यासाहेब लोखंडे, बाळासाहेब शिंदे, काका मोगल, उमेश सरडे, नितीन तरगे, दादासाहेब देवकते, शरद घरबुडवे, दिलीप फरतडे उपस्थित होते.

---

Web Title: Release the overflow water from the Kukdi dam into the Sina river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.