कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या दहा गायींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:05+5:302021-07-02T04:16:05+5:30
बार्शी : कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारा टेम्पो बार्शी तालुका पोलिसांनी गुरुवारी पहाटे आगळगाव चौक येथे पकडला. यातील ...
बार्शी : कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारा टेम्पो बार्शी तालुका पोलिसांनी गुरुवारी पहाटे आगळगाव चौक येथे पकडला. यातील दहा गायींची सुटका करून टेम्पो जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक हमीद अब्दुल अजिम शेख (वय-५६, रा. गडेगावरोड, बार्शी) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तालुका
पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार ठोंगे, पोलीस राजेंद्र मंगरुळे, भांगे हे त्याच्या पथकासह पेट्रोलिंग करत असताना आगळगाव येथे १ जुलै रोजी पहाटे चौकात येताच बार्शीकडून येणारा टेम्पो उभा करून चालकास खाली उतरविले. पोलिसांनी टेम्पोत चढून पाहणी करताना १० जर्सी गायी अपुऱ्या जागेत बांधलेल्या दिसल्या. त्यांच्या चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने ती जनावरे केवळ त्यांची कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेल्या अवस्थेत दिसल्याचा संशय आला. चालकाने चालकाने या गायी उस्मानाबाद जिल्ह्यातील केज येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी जात असल्याचे सांगितले. सदर जनावरे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी हवालदार राजेंद्र मंगरुळे यांनी ताब्यात घेऊन प्राणीमित्र धनयकुमार पटवा यांच्याकडे देऊन त्यांनी गोशाळेत दाखल केल्या आहेत.
----