कोरोना बाधितांना बार्शीतील कोविड सेंटरचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:40+5:302021-05-16T04:20:40+5:30
कुर्डुवाडी : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आ.डाॅ. तानाजी सावंत यांनी बार्शीत १ हजार बेडचे कोविड रुग्णांसाठी रुग्णालय सुरू ...
कुर्डुवाडी : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आ.डाॅ. तानाजी सावंत यांनी बार्शीत १ हजार बेडचे कोविड रुग्णांसाठी रुग्णालय सुरू केले. कुर्डुवाडी व परिसरात ऑक्सिजन किंवा बेड उपलब्ध न झालेल्या रुग्णांना याचा दिलासा मिळत असल्याची माहिती कुर्डुवाडी शहर प्रमुख समाधान दास यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आमदार डॉ. तानाजी सावंत आणि प्रा. शिवाजी सावंत यांच्या पाठपुराव्यातून पंढरपूर येथील विश्रामगृहात कोरोनाबाधित रुग्णांबाबत बैठक झाली. या बैठकीत शिवसेना नेते डाॅ. सावंत यांनी बार्शीत भगवंत इन्स्टिट्यूट अभियांत्रिक विद्यालय येथे नव्याने १ हजार रुग्णांसाठी सुरू केलेल्या कोरोना उपचार केंद्राची माहिती दास यांनी दिली. कुर्डुवाडीत रुग्णांना अडचणी उद्भवल्यास बार्शीतील रुग्णालयात पाठवून द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी भैरवनाथ शुगर येथे लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुर्डुवाडी शहरातील डॉ.रोहित बोबडे, डॉ.लकी दोशी, डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्या उत्कृष्ट सेवेबाबत चर्चा झाली. यावर डाॅ.आ तानाजी सावंत व प्रा. शिवाजीराव सावंत यांनी या सर्व डॉक्टर, कर्मचारी यांचे कौतुक केले. या बैठकीला भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, उप जिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश वानकर,पंढरपूर शहरप्रमुख रवी मुळे, संजय कोकाटे, महिला आघाडीच्या आशाताई टोणपे उपस्थित होते.
..............
फोटो : १५ कुर्डूवाडी
पंढरपूर येथील बैठकीत आ.डॉ.तानाजी सावंत यांच्याशी कोरोना आढावावर चर्चा करताना समाधान दास.