सलग तीन दिवस पावसामुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:09+5:302021-07-11T04:17:09+5:30
चालू वर्षी सांगोला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने वेळेवर व दमदार हजेरी लावली. अशातच मृग नक्षत्राच्या पावसानेही वेळेत दमदार हजेरी लावल्यामुळे ...
चालू वर्षी सांगोला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने वेळेवर व दमदार हजेरी लावली. अशातच मृग नक्षत्राच्या पावसानेही वेळेत दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले होते. त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. पुन्हा आर्द्रा नक्षत्राचा सलग दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने वातावरणात प्रचंड बदल झाला.
दरम्यान, मध्यंतरी आठ ते दहा दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांसह कृषी केंद्र दुकानदारांचे तोंडचे पाणी पळाले होते. दररोज आकाशात ढगाळ वातावरण, तर कधी कडक ऊन असा ऊन सावलीचा खेळ चालू होता. ८ जुलैला अचानक वातावरणात बदल झाला आणि पुनर्वसूच्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ८, ९ व १० जुलैला सलग तीन दिवस तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, तालुक्यात कोठेही नुकसानकारक स्थिती नाही.
----
मंडलनिहाय पाऊस
सांगोला तालुक्यातील नऊ मंडलनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी अशी : सांगोला-११, हातीद-२, नाझरे-४, महूद-२३, संगेवाडी-२०, सोनंद- १८, जवळा-२, कोळा-९, शिवणे-४ असा एकूण ९३, तर सरासरी १०.३३ मि. मी. पाऊस झाला आहे.
----