भंडारकवठ्याच्या सरपंचासह सहा सदस्यांना दिलासा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश निवडणूक आयोगाकडून रद्द  

By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 12, 2023 04:57 PM2023-12-12T16:57:08+5:302023-12-12T16:57:43+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल विरोधात संबंधित सरपंच व सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती.

Relief to six members including the sarpanch of Bhandarkavat, District Collector's order canceled by the Election Commission | भंडारकवठ्याच्या सरपंचासह सहा सदस्यांना दिलासा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश निवडणूक आयोगाकडून रद्द  

भंडारकवठ्याच्या सरपंचासह सहा सदस्यांना दिलासा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश निवडणूक आयोगाकडून रद्द  

सोलापूर : निवडणुकीचा खर्च वेळेवर न दिल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे ग्रामपंचायतच्या सरपंचासह इतर सहा सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याची कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल विरोधात संबंधित सरपंच व सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आयोगाकडे सुनावणी होऊन सरपंच आणि इतर सदस्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. या सर्वांचे सदस्यपद कायम ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.
 
यात सरपंच भीमाशंकर कल्लाप्पा बबलेश्वर, सदस्य स्मिता अशोक मुक्काणे, सोमनिंग धरेप्पा कमळे, संगप्पा काशीराम बिराजदार, युक्ता यतीन शहा, राजश्री उमेश जंगलगी (सर्व रा. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) यांचा समावेश आहे. या प्रकरणात अर्जदार सिद्धेश्वर महादेव कुगणे यांनी सहा जणांविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्यत्व रद्द करण्याबाबत तक्रार अर्ज केला होता.

Web Title: Relief to six members including the sarpanch of Bhandarkavat, District Collector's order canceled by the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.