चपळगाववाडीत धार्मिक ऐक्य; मोहरमचे पंजे मंदिरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:19+5:302021-08-20T04:27:19+5:30

ग्रामदैवत श्री रेवणसिद्धेश्वरांच्या यात्रेत मुस्लीम बांधवांचा सहभाग असतो. त्याप्रमाणे मोहरममध्ये हिंदू बांधवांचाही मोठा सहभाग असतो. गेल्या तीन पिढ्यांपासून बाराईमाम, ...

Religious unity in Chapalgaonwadi; Moharram's claws in the temple! | चपळगाववाडीत धार्मिक ऐक्य; मोहरमचे पंजे मंदिरात!

चपळगाववाडीत धार्मिक ऐक्य; मोहरमचे पंजे मंदिरात!

Next

ग्रामदैवत श्री रेवणसिद्धेश्वरांच्या यात्रेत मुस्लीम बांधवांचा सहभाग असतो. त्याप्रमाणे मोहरममध्ये हिंदू बांधवांचाही मोठा सहभाग असतो. गेल्या तीन पिढ्यांपासून बाराईमाम, हुसेनभाषा, मोठे नालसाब व छोटे नालसाब यांचे पंजे ग्रामदैवत रेवणसिद्धेश्वरांच्या मंदिरात जातात. विशेष म्हणजे येथील परमेश्वर नागणसुरे या हिंदू धर्मातील भक्तास पंजा पकडण्याचा मान आहे. नागणसुरे परिवारातील तीन पिढ्यांपासून चाललेला हा मान आजही कायम आहे. मोहरमच्या उत्सवातील सलग तीन दिवस हा भेटीचा अनमोल योग याठिकाणी पाहावयास मिळतो. यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळत हा भेटीचा योग साध्या पद्धतीने पार पडला.

...........

गावातील हिंदू-मुस्लीम धार्मिक ऐक्य अनेक पिढ्यांपासून चालत आलेले आहे. कोणतेही उत्सव सर्वजण मिळून मिसळून करतो. पूर्वजांकडून चालत आलेली प्रथा आजही सुरू आहे. यापुढेही ही परंपरा कायम ठेवू.

-लक्ष्मी अंकलगे, सरपंच, चपळगाववाडी

190821\img-20210819-wa0012.jpg

चपळगाववाडी या गावातील हेच पंजे भेटीच्या निमित्ताने ग्रामदैवत श्री रेवणासिद्धेश्वरांच्या मंदिरात नेले जातात..

Web Title: Religious unity in Chapalgaonwadi; Moharram's claws in the temple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.