शिल्लक पाण्याचा शेतकरी, नागरिकांना होणार फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:55+5:302021-04-05T04:19:55+5:30
करकंब गाव जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्याच्या नकाशावर आहे. हे पुसून काढण्यासाठी येथील ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख, उपसरपंच ...
करकंब गाव जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्याच्या नकाशावर आहे. हे पुसून काढण्यासाठी येथील ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला येथील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सहकार्य करीत आहेत. येथील ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या पाणीपुरवठ्याच्या पाण्यातून शिल्लक राहिलेले पाणी उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून येथील ओढ्यात व गाव तळ्यात सोडले आहे. या पाण्याचा फायदा येथील नागरिकांना व शेतकरी बांधवांना होणार आहे.
यावेळी ॲड. शरद पांढरे, प्रा. सतीश देशमुख, अमोल शेळके, मदार मुर्शद, सचिन शिंदे, सतीश माळी, सावता खारे, महेंद्र शिंदे, अभिषेक पुरवत, शरद शिंदे, सचिन दुधाळ, अशोक जाधव, बिनू माळी, विजय जेव्हरी, भगवान जगताप, बंडू खपाले
आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :::::::::::::::::::::
पाणीपुरवठ्याचे अतिरिक्त पाणी तळ्यात, ओढ्यात सोडताना ॲड. शरद पांढरे, प्रा. सतीश देशमुख व अन्य.