शेतकºयांना दिलासा; शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या बंद पाईपलाईनच्या कामाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:21 PM2018-12-28T13:21:28+5:302018-12-28T13:23:36+5:30
सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या बंद पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्षात गुरुवारी सुरुवात झाली. भीमा ...
सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या बंद पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्षात गुरुवारी सुरुवात झाली. भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ झाला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील क्षेत्राला उपयोगी ठरणाºया शिरापूर उपसा सिंचन योजनेला नव्याने प्रशासकीय मान्यता नसल्याने दोन वर्षे काम ठप्प झाले होते. त्यातच नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या कालव्याचे काम करण्यास वनपरिक्षेत्र कार्यालयाने मज्जाव केला होता. वनपरिक्षेत्र कार्यालयाने काम अडविल्याने २०१३ पासून थांबलेले काम गुरुवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सुरू झाले.
शिरापूर उपसा सिंचनच्या उजव्या कालव्याचे किलोमीटर ८ व ९ मध्ये बंद पाईललाईनचे सुमारे दीड किलोमीटर इतके काम होणार आहे. यासाठी साधारण १० कोटींचा खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता रमेश वाडकर, सहायक अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, अभियंता भाऊसाहेब पाटील, ठेकेदार नानासाहेब शेळके, बाळासाहेब दबडे, बाळासाहेब पाटील, भारत बोंगे, अनिल भोसले, गोपाळ गवळी, प्रकाश गवळी,नंदू गवळी, लहू मुळे, प्रफुल्ल पाटील आदीसह गावकरी उपस्थित होते.
आता संपूर्ण काम पाईपलाईनचेच..
माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या दीड किलोमीटरचे काम आता बंद पाईपलाईनचे होणार असून आता उर्वरित सर्वच लहान-मोठ्या कालव्याची कामे ही बंद पाईपलाईनची होणार आहेत. उजव्या कालव्याचे उर्वरित १९ किलोमीटरपर्यंतचे काम तसेच रानमसले वितरिकेचे काम बंद पाईपलाईनचे होणार असल्याचे सांगण्यात आले.