बार्शीत रेमडेसिविर, ऑक्सिजनचा पुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:00+5:302021-04-20T04:23:00+5:30
तालुक्यात १२ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहेत. तेथे एकूण बेडची क्षमता ५०८ आहे. ...
तालुक्यात १२ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहेत. तेथे एकूण बेडची क्षमता ५०८ आहे. तालुक्यात जवाहर हॉस्पिटल व इतर ठिकाणी ११० नवीन बेड प्रस्तावित आहेत. सध्या एकूण ४ कोविड केअर सेंटर आहेत. तेथील बेडची क्षमता ६८१ आहे. ग्रामीण भागात आगळगाव, पानगाव, चिखर्डे,
वैराग, गौडगाव, उपळे दुमाला, खांडवी येथील शासकीय व ४ खासगी कोविड केअर सेंटर प्रस्तावित आहेत. येथील
बेडची क्षमता ७५० आहे. तसेच तालुक्यात एकूण १४३१ बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.
तालुक्याव्यतिरिक्त माढा, करमाळा, मोहोळ, भूम, परंडा, वाशी, कळंब, केज, जामखेड, उस्मानाबाद,
तुळजापूर आदी इतर ११ तालुक्यांतील कोविड रुग्णांचा अतिरिक्त ताण येथील रुग्ण सेवेवर आहे. त्यामुळे बार्शी तालुक्याला रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनची गरज जास्त प्रमाणात आहे. त्या अनुषंगाने केवळ बार्शी नव्हे तर इतर तालुक्यातील सर्व रुग्णांची संख्या विचारात घेऊन तालुक्याला रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा करावा, असे निवेदनात म्हटले आहे.