वाखरी येथील अतिक्रमणे काढून टाका : जिल्हाधिकारी, आषाढी यात्रेबाबत नियोजन बैठक
By admin | Published: June 6, 2017 05:14 PM2017-06-06T17:14:29+5:302017-06-06T17:14:29+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. 0६ :- पिराची कुरोली, वाखरी येथील अतिक्रमणे काढून टाका, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर यात्रेबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक एस. विरेश प्रभू , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सजेर्राव दराडे आदी उपस्थित होते.
कालावधीत मोबाईल कनेक्टिव्हटी सुरू राहण्यासाठी बीएसएनएल ने अतिरिक्त टॉवर व्हॅन देता येईल का याचा विचार करावा. त्याचबरोबर खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधिंना याबाबत तयारी बैठकीसाठी बोलवावे व दूरध्वनी सेवा अखंडित राहील याची काळजी घ्यायला हवी. मोबाईल टॉवरची क्षमता वाढवावी.
बैठकीत पालखी मार्गावरील रस्ते, पालखी तळाच्या ठिकाणची व्यवस्था, दिंडीत समावेश असलेल्या टँकरना करावयाचा पाणी पुरवठा याबाबत चर्चा झाली. जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले की वारीच्या राहील याची काळजी घ्यायला हवी .मोबाईल टॉवरची क्षमता वाढवावी. जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले की वारीच्या कालावधीत पंढरपूरातील मद्याची दुकाने , मांसाहारी हॉटेल बद राहतील याची दक्षता घ्यावी .
अन्न भेसळ प्रशासनाकडून प्रतिबंधक पथके नियुक्त करवीत. त्यासाठी इतर जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा मागवून घ्याव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.यात्रेबाबत संदभार्तील महत्वाचे आदेश लवकरात लवकर काढले जावेत. उपविभागीय अधिकारी स्तरावरील आदेश लवकरात लवकर काढले जावेत . यात्रेच्या कालावधीत मंदिर परिसरात वीज पुरवठा करताना सुरक्षित वायरिंग केले जावे. त्याचबरोबर पालखी तळाच्या परिसरात आणि मार्गावरील वीज जोडण्या याची तपासणी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. संभाव्य पूरस्थिती विचारात घेऊन पाण्याची पातळी आणि पाण्याचा विसर्ग याबाबत सातत्याने लक्ष ठेवले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या.
बैठकीस पंढरपूरचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, कार्यकारी अभियंता सुरेश राऊत , जिल्हा शल्यचिकित्सक मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, उपविभागीय अधिकारी संजीव जाधव, ज्योती पाटील, शिवाजी जगताप, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, माळशिरसच्या तहसीलदार बाई माने, एसटीचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी आदी उपस्थित होते.