नऊ परिवार देवतांचे तेज काढून पुन्हा प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:37+5:302020-12-25T04:18:37+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विविध परिवार देवतांच्या मूर्ती भंग पावलेल्या होत्या. त्या मूर्ती नव्याने तयार करून घेण्यात आल्या. मंदिर समितीचे ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विविध परिवार देवतांच्या मूर्ती भंग पावलेल्या होत्या. त्या मूर्ती नव्याने तयार करून घेण्यात आल्या. मंदिर समितीचे सदस्य, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवतांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना १८ डिसेंबर २०२० पासून सुरू होती. त्यामध्ये पहिल्या तीन दिवसांत कलाकर्षण विधी, जुन्या भंग पावलेल्या मूर्तींचे तेज काढून घेण्याचा विधी करण्यात आला. चौथ्या दिवशी या सर्व मूर्तींचे हवन केले. पाचव्या दिवशी सर्व मूर्तींवर जलाधिवास विधी करून स्तपन विधी करण्यात आला. त्यानंतर या नवीन सर्व मूर्तींना शैयाधिवास व धान्याधिवास करून ७ दिवसांत हा विधी पार पडला.
यामध्ये नवग्रह, स्थापत्य देवतांचे हवन, आरोहण असे यज्ञकर्म करण्यात आले. त्यानंतर त्या त्या मूर्तीचे हवन व स्थापना करून प्रत्येक मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना गुरुवारी शुभमुहूर्तावर करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
या सर्व विधींना यजमान म्हणून मंदिर समितीचे विभाग प्रमुख पदावरील कर्मचारी सपत्नीक उपस्थित होते. यावेळी मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे, सल्लागार परिषदेचे सदस्य ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर तसेच विधीसाठी आलेले ब्रह्मवृंद, मंदिर समितीचे पुरोहित व इतर कर्मचारी उपस्थित होते.
या नऊ मूर्ती बदलल्या
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्यंकटेश मंदिराजवळील धुंडीराज गणपती मूर्ती, शनि मंदिराजवळील चिंतामणी गणपती मूर्ती, सोळखांबीतील गणपती मूर्ती, शनि मंदिरातील दत्त मूर्ती, बोधले महाराज आवारातील विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती तर शहरातील परिवार देवतेच्या विष्णुपद मंदिरातील विष्णू मूर्ती, त्रिंबकेश्वर मंदिराशेजारील खंडोबा मूर्ती, काळा मारुती मंदिरातील शनि मूर्ती, शनि काळभैरव मंदिरातील नवग्रह मूर्ती बदलण्यात आल्या आहेत.
दोन मूर्तींची जागा बदलली
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल सभामंडप येथील दीप स्तंभाजवळील हनुमंत (मारुती) व गरुड या दोन्ही देवांच्या मूर्ती सोळखांबी येथील पितळी दरवाजासमोर विधिवत पूजा करून बसविण्यात आल्या आहेत.
--------
फोटो २४पंड०१
विठ्ठलाच्या परिवार देवतांमधील भंग पावलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंदिर समितीचे सदस्य भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बृह्मवृंदांमार्फत विधिवत पूजा करण्यात आली. (छाया : सचिन कांबळे)
===Photopath===
241220\24sol_3_24122020_4.jpg
===Caption===
विठ्ठलाच्या परिवार देवतांमधील भंग पावलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंदिर समितीचे समितीचे सदस्य भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बृम्हवृंदामार्फत विधिवत पूजा करण्यात आली. (छाया : सचिन कांबळे)