‘विठ्ठल’च्या चेअरमन पदावरुन भालके यांना हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:33+5:302021-09-03T04:23:33+5:30
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक होता. १९९७ साली कारखान्यावर सत्तांतर झाले. तेव्हापासूनच कारखान्याची ...
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक होता. १९९७ साली कारखान्यावर सत्तांतर झाले. तेव्हापासूनच कारखान्याची आर्थिक शिस्त बिघडली. अलीकडच्या दोन- तीन वर्षात तर कारखाना आर्थिक डबघाईला आला. मागील दोन वर्षापूर्वी कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की संचालक मंडळावर ओढवली.
आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालकेंच्या हाती कारखान्याचा कारभार दिला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यात त्यांच्याकडूनही कारखान्याच्या कारभारात प्रगती झाली नाही. मागील दोन वर्षापूर्वी गाळपास आलेल्या उसाची एफआरपी आणि कामगारांचा २१ महिन्यांचा पगार थकीत आहे. त्यातच ऊस वाहतूक ठेकेदारांचेही देणे थकीत राहिल्याने भालके यांच्याविषयी शेतकरी, कामगार आणि वाहतूक ठेकेदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
......
भालके यांनी दिली होती डेडलाईन
२०१८-१९ व २०१९-२० या दोन गाळप हंगामातील शेतकऱ्यांचे सुमारे ३० कोटी ५० लाख, कामगारांचे १६ लाख व ऊस वाहतूक ठेकेदारांचे ७ कोटी असे मिळून सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांची थकीत देणी आहेत. थकीत रक्कम देण्यासंदर्भात संचालक मंडळाची २३ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये भालके यांनी आठ दिवसात संपूर्ण थकीत रक्कम देतो असे आश्वासन दिले होते. आठ दिवसांची मुदत संपून गेली आहे. त्यानंतरही त्यांनी कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे भगीरथ भालके यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मार्ग मोकळा करावा, असे युवराज पाटील यांनी सांगितले.